Agri : अज्ञातांकडून शेतातील पाइपलाइनची नासधूस

0
40

Agriculture ;वाखारवाडी ता देवळा येथील शेतकरी किशोर जिभाऊ निकम यांच्या घराजवळच्या शेतात गुरुवारी दि २३ रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी पाईपलाईन कापून तसेच वीज पंपाची वायर तोडून नुकसान केले आहे. या घटनेचा देवळा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत देवळा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की , गुरुवारी दि १३ रोजी रात्री च्या सुमारास वाखारवाडी येथील शेतकरी किशोर निकम यांच्या शेतात ठिबक सिंचन करण्यात आले. यासाठी वापरण्यात येणाऱ्या पीव्हीसी पाईप पैकी सात पाईपांची अज्ञात इस्मानी मोडतात करून नुकसान केले आहे. तसेच वीज पंपाची वायर देखील तोडून टाकली आहे.यामुळे शेतकरी निकम यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले असून, या घटनेचा देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

दरम्यान ,अशा खोडसाळपणा करणाऱ्या इसमांचा पोलिसांनी कसून शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी . अशी मागणी शेवटी शेतकरी किशोर निकम यांनी केली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here