विष्णू थोरे
चांदवड: भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे होत असल्याच्या अनुषंगाने आझादी का अमृत महोत्सव अर्थात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत दिनांक १३ ऑगस्ट २०२२ रोजी चांदवड येथील एस. एन.जे.बी संचलित स्व.सौ कांताबाई भवरलालजी जैन अभियांत्रिकी महाविद्यालयात विदयार्थी विकास मंडळ आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने माजी सैनिक वाल्मीक पवार, राहूड ता.चांदवड ( Paro Commando Indian Army) (२००२-२०२१) यांचा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. डी.कोकाटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
वाल्मिक पवार यांनी देशभक्तीपर सेवा बजावत असताना आलेले विविध प्रसंग उपस्थितांना सांगितले. कार्यक्रमाची सुरूवात विद्यार्थी सागर शर्मा (संगणक विभाग) यांच्या तबला वादनाने झाली. कु.अबोली आहेर हीने रक्षाबंधनाचे औचित्य साधून वाल्मिक पवार यांना राखी बांधली. तर कार्यक्रमाचा समारोप कु. शुभांगी फुके या विद्यार्थिनीच्या मनोगताने करण्यात आला. सदर विद्यार्थिनीचे वडील हे माजी सैनिक अधिकारी होते व भाऊ देखील सैनिकी सेवेत कार्यरत आहे.तिने सैनिकांच्या कुटुंबांना येणारी जबाबदारी व अडचणींवर मात करत विविध सुख दुःखाचे प्रसंग सांगितले.
कार्यक्रमाचे आयोजन विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.सुशील ठाकरे व राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा.दिपेश अग्रवाल यांनी केले. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. एम.आर. संघवी, सर्व विभाग प्रमुख , शिक्षक कर्मचारी, विद्यार्थी आदी बहुसंख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल संस्थेच्या विश्वस्त समितीचेअध्यक्ष बेबीलाल संचेती, विश्वस्त समितीचे उपाध्यक्ष व महाविद्यालयाचे समन्वयक दिनेशकुमार लोढा, सेक्रेटरी जवाहरलाल आबड, प्रबंध समितीचे अध्यक्ष अजितकुमार सुराणा, उपाध्यक्ष अरविंदकुमार भन्साळी, तसेच प्रबंध समितीचे सहमानद सचिव व महाविद्यालयाचे समन्वयक झुंबरलाल भंडारी व सुनीलकुमार चोपडा आदींसह सर्व विश्वस्त मंडळ व सर्व प्रबंध समितीचे सदस्य आदींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम