World : सगळ्यात लहान बाळ, २२व्या आठवड्यात जन्म आणि वजन अवघं….

0
16

America : तुम्ही जगातील अनेक प्रीमॅच्युअर बाळांबद्दल ऐकले असेल. काही एक किलो तर काही 800 ग्रॅम. अगदी 400 ग्रॅमचे मूल जन्माला आलेल ऐकलं असेल, पण त्याहून ही लहान बाळ नुकतंच जन्मल आहे. याला जगातील सर्वात लहान कमी वजनाच प्रिमच्युर बेबी म्हणून घोषित करण्यात आलं आहे. अवघ्या 22 आठवड्यात या बाळाचा जन्म झाला आज ते पूर्णपणे ठीक आहे. मात्र हे पाहून जगभरातील डॉक्टर आश्चर्यचकित झाले असून या घटनेला चमत्कार असल्याच म्हणत आहेत.

हे प्रकरण अमेरिकेच्या कनेक्टिकट भागातील आहे. हे बाळ एक मुलगी असून जेव्हा हे बाळ सेंट फ्रान्सिस रुग्णालयातून घरी जात होत तेव्हा रुग्णालयातील संपूर्ण कर्मचाऱ्यांनी जल्लोष करत आनंद व्यक्त केला. त्यांच्या या अनोख्या आनंदी निरोप समारंभावेळी बाळाचे पालक भारावून गेले होते. America मोठ्या थाटामाटात त्याला घरी पाठवण्यात आले.

दरम्यान याबाबत डॉक्टरांनी सांगितले की, विषबाधा झालेल्या फ्रान्सिस अँगुएरा यांना 18 फेब्रुवारीला रुग्णालयात आणण्यात आले. त्यावेळी तिला प्रचंड वेदना होत होत्या. 22 फेब्रुवारीला सकाळी मुलीचा जन्म झाला. त्या वेळी बाळाचे वजन फक्त 12.4 औंस म्हणजेच सुमारे 350 ग्रॅम होते. हे पाहून डॉक्टर America घाबरले. कारण एवढी लहान मुलगी त्यांनी सुद्धा कधीही पाहिली नव्हती. ते अर्भक तळहातात बसेल इतक लहान होत.

*जन्मतः बाळाला निमोनियाचा झाला होता*

डेली मेलच्या रिपोर्टनुसार, महिलेने तिची बाळांतळणाची गोष्ट सोशल मिडियावत शेअर केली आहे. यात तिने सांगितले की, जेव्हा मला मुलगी झाली तेव्हा तिला न्यूमोनिया झाला होता. आम्हा दोघांनाही खूप धोका सांगितला होता. मात्र रुग्णालयातील डॉक्टरांनी हार मान्य न करता तातडीने उपचार सुरू केले. Americaसुरुवातीला बाळाला वाचवणे कठीण जाईल असे वाटत होते, पण डॉक्टरांनी परिस्थिती सांभाळून घेत बाळाची चांगली काळजी घेतली. जवळपास 4 महिने उपचार चालले आणि गुरुवारी मुलगी हसत हसत घरी पोहोचली. आता त्याचे वजन 7.5 पौंड म्हणजेच 3.40 किलो झाले होते.

*अशा मुलांची जगण्याची शक्यता नगण्य असते*

डॉक्टरांच्या मते, अशा मुलांची जगण्याची शक्यता नगण्य आहे. Americaकारण त्यांचे संपूर्ण शरीर विकसित झालेले नसते, तेव्हाच ते जन्माला येतात. पण देवाचे आभार या मुलीला अशी कोणतीही अडचण नाही.

हॉस्पिटलचे संचालक जोस एरियास-कॅमिसन म्हणाले, मुलीचे सुखरूप घरी जाणे हा आमच्यासाठी भावनिक क्षण होता. मला बाळ आवडतात.America मी त्या मुलीवर खूप प्रेम करू लागलो होतो. आम्‍ही तुम्‍हाला सांगू इच्छितो की अमेरिकेतील सर्वात लहान बाळ व अविकसित असताना जन्मलेले बाळ हे कर्टिस झी-कीथ मीन्‍स होते, ज्याचा अलाबामा युनिव्‍हर्सिटी ऑफ अलाबामा बर्मिंगहॅम हॉस्पिटलमध्‍ये 5 जुलै 2020 रोजी अवघ्या 21 आठवड्यांत जन्म झाला होता.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here