रशिया आणि युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतासह जगभरातील सराफा बाजारात चढ-उतार सुरूच आहेत. देशातील सोन्या-चांदीच्या दरात वाढ सुरूच आहे. लग्नसंमारंभामुळे सोन्याची मागणी जशी वाढली आहे तसा सोन्याचा दरही वाढतच आहे.
गेल्या महिन्यात ९ मार्च पर्यंत सोन्याच्या दराने ५५ हजाराचा टप्पा पार केला होता. सलग सात दिवस सोन्याच्या दरात होणाऱ्या वाढीला आज ब्रेक लागला असून आज पुन्हा एकदा सोन्या-चांदीच्या भावात घसरण झाली आहे. मंगळवारी सुद्धा सोन्याच्या दरात तेजी कायम आहे. आज मुंबईत १ ग्रॅम सोन्याची किंमच २२ कॅरेट साठी ४,९५५ आहे तर २४ कॅरेट सोन्यासाठी ५,४०६ आहे. आज सोन्याची किंमत ५३,२४८ रुपये प्रति १० ग्रॅम झाला.
यापूर्वी कोरोनाच्या पहिल्या लॉकडाऊनमध्ये सोने ५६,२०० प्रति तोळ्यावर गेले होते. आज दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत जोरदार झेप घेतली आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे सोने आणि चांदीला मात्र तेजीसाठी पोषक वातावरण तयार होत आहे. दुसरीकडे चांदी २७०० ते २८०० रुपयांनी महागली आहे. दरम्यान, चालू आठवड्यात सोने दर ५४ हजारापुढे गेले आहे. तर चांदीने देखील ७१ हजाराचा टप्पा ओलांडला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम