आत्मविश्वासच्या जोरावर स्पर्धा परीक्षेत यश हमखास – हेमंत पाटील

0
8
पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातलेल्या हेमंत पाटील यांचा सत्कार करताना कनकापूर विकास सोसायटीचे चेअरमन नामदेव शिंदे आदी(छाया - सोमनाथ जगताप)

देवळा : अभ्यास व आत्मविश्वासाच्या जोरावर स्पर्धा परीक्षेत सहज यश मिळू शकते असे प्रतिपादन पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातलेल्या हेमंत पाटील याने केले.

पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातलेल्या हेमंत पाटील यांचा सत्कार करताना कनकापूर विकास सोसायटीचे चेअरमन नामदेव शिंदे आदीछाया सोमनाथ जगताप

सण२०२२ मध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत हेमंत पाटील उत्तीर्ण होऊन त्याची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल कनकापूर ता देवळा येथील विकास सोसायटीचे चेअरमन नामदेव शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी तो बोलत होता. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी पाहिजे तसे मार्गदर्शन मिळत नाही. अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून व आई वडील शेतकरी असतांना हेमंतने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली .अपयशाला खचून न जाता त्याने आपल्या जिद्दीवर पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत गवसणी घातली.

पाळे ता कळवण येथील शेतकरी कुटुंबातील हेमंत पाटील याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण आपल्या जन्म गावातच झाले .दहावीनंतरनंतर बीएस्सी पर्यन्त चे शिक्षण सटाणा महाविद्यालयात झाले .अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत हेमंतने सण २०१४ पासून स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली .यानंतर सण २०१५ व १६ मध्ये मुख्य परीक्षा दिली. जिद्द व चिकाटीच्या जोरावर सण २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत हेमंत पाटील उत्तीर्ण झाला व त्याची पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली . शहरी विद्यार्थ्यांबरोबरच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी देखील स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होतात . मोबाइल चा अतिवापर टाळून विद्यार्थ्यांनी वाचनावर लक्ष केंद्रित करून आपले ध्येय साध्य करावे ,असे पाटील याने यावेळी सांगितले.
हेमंत हा पाळे ता कळवण येथील प्रगतिशील शेतकरी सुरेश पाटील यांचा मुलगा असून, त्याच्या ह्या त्याच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक केले जात आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here