
देवळा : उमराणे येथे श्री छत्रपती विद्यालयात झालेल्या तालुकास्तरीय शालेय योगासन क्रीडा स्पर्धेत भावडे ता देवळा येथील व्ही. के. डी. इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व एस. के. डी. इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी ऋत्विक वाघ व हेमांगी खैरनार यांनी प्रथम क्रमांक पटकावून यश संपादन केले.

यशस्वी विद्यार्थ्यांची नाशिक येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. विद्यालयाचे प्राचार्य पाटील एस. एन. व वाघ एन. के. यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विद्यालयाचे क्रीडाशिक्षक यज्ञेश आहेर, मुदस्सर सय्यद, गगन कुमार सिंह, पंकज चेतलापल्ली, निलेश गुप्ता यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे चेअरमन संजय देवरे व सचिव मीना देवरे तसेच शिक्षकेतर कर्मचारी सागर कैलास , बबलू देवरे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम