भावडे येथील एस.के.डी. इंटरनॅशनल स्कूल मध्ये तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धां संपन्न

0
17

देवळा ; विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासोबत शारीरिक विकासाला प्राधान्य देत भावडे येथील एस. के. डी. चॅरिटेबल ट्रस्ट नासिक, संचलित एस. के. डी. इंटरनॅशनल स्कूल, येथे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

भावडे येथील एस .के. डी. विद्यालयात तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांचे उदघाटन करतांना क्रीडा शिक्षक सुनील देवरे , सुनील आहेर ,यज्ञेश आहेर व उपस्थित खेळाडू आदी ( छाया -सोमनाथ जगताप )

या स्पर्धांमध्ये क्रिकेट, फुटबॉल, हॉलीबॉल, कबड्डी, कराटे या खेळांचा समावेश होता. स्पर्धेसाठी तालुक्यातील शाळांनी आपला सहभाग नोंदविला. चार दिवस चाललेल्या या स्पर्धांमध्ये,सहभागी सर्व शाळांच्या संघांनी खेळाडू वृत्तीचे प्रदर्शन करत. स्पर्धेची मनोरंजकता वाढवली. संपन्न झालेल्या स्पर्धेत व्ही.के.डी. इंग्लिश मीडियम स्कूल 14 वर्षाखालील मुलांच्या व एस. के. डी. इंटरनॅशनल स्कूल मुलींच्या क्रिकेट संघाची जिल्हास्तरावर निवड झाली. तसेच एस. के. डी. स्कूलच्या 17 वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट संघाची जिल्हास्तरावर निवड झाली.

फुटबॉल स्पर्धेत 14 वर्षाखालील मुले व मुलींच्या एस.के.डी. इंटरनॅशनल स्कूलच्या संघाची जिल्हास्तरावर निवड झाली. कबड्डी स्पर्धेसाठी तालुक्यातील एकूण 30 संघांनी सहभाग नोंदविला त्यात 17 वर्षाखालील भउर विद्यालयाच्या संघाची व 19 वर्षाखालील देवळा महाविद्यालयाच्या व 17 वर्षाखालील के. एल. डी. विद्यालयाच्या मुलींच्या संघाची जिल्हास्तरावर निवड झाली. तसेच उमराणे येथे झालेल्या तालुकास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेत 14 वर्षाखालील व 17 वर्षाखालील मुलांच्या एस.के.डी. विद्यालयाच्या संघाने व 19 वर्षाखालील व्ही.के.डी. इंग्लिश मीडियम स्कूलच्या संघाने अंतिम सामन्यात विजय मिळवून, जिल्हास्तरासाठी पात्र ठरले.

सांघिक खेळांसाठी व स्पर्धांसाठी तालुका क्रीडा अधिकारी सुनील देवरे, बि.डी खैरनार , डॉ.सुनील आहेर, विद्यालयाचे प्राचार्य एस. एन.पाटील , एन. के. वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा शिक्षक यज्ञेश आहेर. मुदसर सय्यद, गगन कुमार सिंह, पंकज चेतलापल्ली, यांचे सहकार्य लाभले. विद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बबलू देवरे, सागर कैलास यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विजय संघांचे व विद्यार्थ्यांचे प्रशिक्षक यांचे संस्थेचे चेअरमन संजय देवरे व सचिव मीना देवरे यांनी अभिनंदन करून जिल्हास्तरीय स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here