देवळा ; भावडे येथील एस.के.डी.इंटरनॅशनल स्कूल व व्ही. के.डी.इंग्लिश मीडियम स्कूल येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. दीपक झाल्टे, विठ्ठल खैर, गंगाबाप्पू मोरे, शीतल बिरारी, रिया जोशी, मनीषा कदम, हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

विद्यालयाचे प्राचार्य एस. एन.पाटील , एन. के.वाघ यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेच्या सचिव मीना देवरे यांनी स्काऊट गाईड झेंड्याचे पूजन करून मानवंदना दिली. अध्यक्ष संजय देवरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत गाऊन भारतीय झेंड्याला सलामी दिली. विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास कराटे प्रात्यक्षिक व दिमाखदार संचलनानी कार्यक्रमाची शोभा वाढवली.
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विविध स्पर्धांमधील विजयी स्पर्धकांना पारितोषिक वितरित करण्यात आले. अध्यक्ष संजय देवरे यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी मार्गदर्शन केले. सांस्कृतिक विभाग प्रमुख शोभा जाधव व रत्नमाला सोनवणे यांनी मार्गदर्शन केले. शिक्षक अजय बच्छाव , अतुल कासव यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी क्रीडा शिक्षक यज्ञेश आहेर, गगन कुमार सिंग, मुद्दसर सय्यद जलील, पंकज चेटलापल्ली, निलेश गुप्ता शिक्षकेतर कर्मचारी सागर कैलास, बबलू देवरे यांनी परिश्रम घेतले .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम