एस.के.डी. व व्ही.के.डी.विद्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने चित्रकला स्पर्धा

0
104
देवळा - भावडे येथील एस.के.डी.व व्ही. के.डी.विद्यालयात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्स निमित्ताने चित्रकला स्पर्धेत सहभागी विद्यार्थी (छाया - सोमनाथ जगताप )

देवळा ; स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव घरोघरी तिरंगा हे देशव्यापी अभियान म्हणजे देशासाठी एक गर्वाचा क्षण आहे.या अभियानात सहभाग घेऊन आपल्या देशाप्रती प्रेम दाखवत तालुक्यातील भावडे येथील एस.के.डी.चॅरिटेबल ट्रस्ट नाशिक संचालित एस.के.डी.इंटरनॅशनल स्कूल व व्ही.के.डी.इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले .

देवळा – भावडे येथील एस.के.डी.व व्ही. के.डी.विद्यालयात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्स निमित्ताने चित्रकला स्पर्धेत सहभागी विद्यार्थी (छाया – सोमनाथ जगताप )

शालेय स्थरावर विद्यार्थ्यांना ह्या अभियानाच्या बाबत जणजागृकतेसाठी चित्रकला स्पर्धे मार्फत सहभाग घेण्याची संधी मिळावी .स्पर्धे प्रसंगी चिमुकल्या चित्रकारांनी आपापल्या वैचारिक व बौद्धिक क्षमतेनुसार विविध रंगांचा उपयोग करून पांढऱ्या शुभ्र कोऱ्या कागदावर भारताचा राष्ट्रीय ध्वज रेखाटून आकर्षक व मनमोहक कलाकृती तयार केल्या. स्पर्धे प्रसंगी विद्यार्थ्यांचे तीन गट तयार करून इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेसाठी माझा भारत महान, भारतीय तिरंगा, स्वातंत्र्य दिवस, हे विषय देण्यात आले. चित्र रंगवताना विद्यार्थ्यांमध्ये देशाबद्दल व भारतीय तिरंगी झेंड्याबद्दल आदरभाव दिसत होता. स्पर्धे दरम्यान विद्यार्थ्यांना तिरंगी झेंड्याबद्दल शिक्षकांमार्फत माहिती सांगण्यात आली.

त्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडली.स्पर्धेच्या आयोजना बाबत प्राचार्य एस.एन. पाटील , एन.के, वाघ ,पर्यवेक्षक एस.जे, पवार , एस.टी.ठाकरे यांचे मार्गदर्शन लाभले. स्पर्धा यशस्वीतेसाठी विद्यालयाचे कला शिक्षक राहुल पाटील,नरेंद्र साबळे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले .स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष संजय देवरे , सचिव मीना देवरे यांनी शुभेच्छा दिल्या.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here