चक्क..कॅरीबॅगमध्‍ये सहा लाखाचे दागिने होते पडून! कुठे तर वाचा सविस्तर

0
13

जळगाव : चक्क..रेल्वे (Railway) स्थानकावर कॅरीबॅगमध्ये सोन्याचे(gold) दागिने(jewellery) सापडल्याची घटना समोर आली. ही घटना पाचोरा रेल्वेस्थानकातील असून तब्बल १३ तोळे वजनाचे ६ लाख ६ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने महिला सफाई कामगार यांना कॅरीबॅगमध्ये सापडले. रेल्वे पोलिसांच्या(police) त्याबत हे दागिने असून पुढील तपास पोलीसांनी सुरू केला आहे.

रेल्वे पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार १६ जूनला दुपारी दोनच्या सुमारास रेल्वे कंत्राटी सफाई कामगार उषा गायकवाड या कचरा टाकण्यासाठी पीजे लोकोशेडच्या मागे गेल्या. परत येत असताना त्यांना हिरव्या रंगाची कॅरीबॅग गाठ बांधलेल्या अवस्थेत दिसली. त्यांनी ती उचलून त्यांचे सुपरवायझर शरद पाटील यांना दाखवली. तर त्यात काही तरी वस्तू असल्याचे लक्षात आले. त्यामुळे उषा गायकवाड व शरद पाटील हे आपल्या सहकारी महिला सफाई कामगारांसोबत रेल्वे स्थानकावरील लोहमार्ग दूरक्षेत्र पोलिस चौकीत येवून ही माहिती दिली.

आणि निघाले सोन्याचे दागिने..

हवालदार ईश्वर बोरुडे यांच्याकडे त्यांनी कॅरीबॅग सोपवली असता, त्यात पिवळ्या धातूचे काही दागिने आढळल्यानंतर ते बेन्टेक्सचे असावेत असा अंदाज व्यक्त करण्यात आला. याबाबत श्री. बोरुडे यांनी रितसर नोंद घेऊन वरिष्ठांना कळवून सोनाराकडे दागिण्यांची तपासणी केली असता, ते दागिणे सोन्याचे (Gold) असल्याचे निष्पन्न झाले. १३ ग्रॅम वजनाच्या ६ लाख ६ हजार रुपये किमतीच्या दागिण्यांमध्ये सोन्याचा हार, चार बांगड्या, कानातील रिंगा, साखळीचे टॉप्स, चैन व पेंडल यांचा समावेश आहे.

हे दागिणे रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले असून याबाबत रात्री उशिराने नोंद करून चाळीसगाव रेल्वे पोलिस मुख्यालयात दागिणे जमा केले असून पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here