दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी जसप्रीत बुमराहच्या जागी मोहम्मद सिराजची वर्णी

0
30

मुंबई : बीसीसीआयने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेतील उर्वरित सामन्यांसाठी जखमी जसप्रीत बुमराहच्या जागी मोहम्मद सिराजचा भारतीय संघात समावेश केला आहे.

कालच जसप्रीत बुमराहने दुखापतीमुळे या मालिकेसह आगामी टी२० वर्ल्डकपमधून माघार घेतली होती. बुमराहच्या पाठीला दुखापत झाली असून तो सध्या बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे. त्यामुळे आता त्याच्या जागी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे.

२८ वर्षीय मोहम्मद सिराज ७ महिन्यानंतर भारतीय संघात परतला आहे. त्याने शेवटचा आंतरराष्ट्रीय टी-२० सामना यावर्षी २७ फेब्रुवारी रोजी खेळला होता. त्यानंतर तो केवळ कसोटी, वनडे, आयपीएल आणि प्रथम श्रेणी सामने खेळत आला आहे.

दक्षिण आफ्रिकाविरुद्ध उर्वरित टी-२० सामन्यांसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक (दोघे यष्टीरक्षक), आर. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, दीपक चहर, उमेश यादव, श्रेयस अय्यर, शाहबाज अहमद आणि मोहम्मद सिराज.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here