प्रसिद्ध गायक केके (कृष्णकुमार कुननाथ) यांचे मंगळवारी पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे एका मैफिलीत परफॉर्म केल्यानंतर काही वेळातच निधन झाले. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. 53 वर्षीय केके (कृष्णकुमार कुननाथ) यांनी हिंदीत 200 हून अधिक गाणी गायली आहेत. त्यांनी हिंदी, तमिळ, तेलुगु, कन्नड, मल्याळम, मराठी आणि बंगालीसह इतर भाषांमध्ये गाणी रेकॉर्ड केली आहेत. कृष्णकुमार कुननाथ यांच्या निधनामुळे संपूर्ण चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.
बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारने ट्विटरवर लिहिले की, “केके यांच्या निधनाबद्दल जाणून अतिशय दुःखी आणि धक्का बसला. ओम शांती”
गायक-राजकारणी बाबुल सुप्रियो म्हणाले, “केके यांच्याशी माझ्या अनेक वैयक्तिक आठवणी आहेत. आम्ही आमची कारकीर्द एकत्र सुरू केली. तो एक अद्भुत व्यक्ती होता.” माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवागने लिहिले, “कोलकाता येथे परफॉर्म केल्यानंतर केकेच्या निधनाबद्दल ऐकून दुःख झाले. आयुष्य किती नाजूक आहे याचे आणखी एक उदाहरण पाहायला मिळत आहे. ओम शांती, त्यांच्या कुटुंबियांना आणि मित्रांच्या संवेदना.
तारक मेहता का उल्टा चष्मा या टेलिव्हिजन शोमध्ये बबिताची भूमिका साकारणाऱ्या मुनमुन दत्ताने गायक केके यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना लिहिले, “माझ्यासारख्या प्रत्येक संगीतप्रेमीसाठी धक्कादायक आहे. देवा काय होत आहे. जीवन खूप अप्रत्याशित आहे. ओम शांती.”
तारक मेहता का उल्टा चष्मा या टेलिव्हिजन शोमध्ये बबिताची भूमिका साकारणाऱ्या मुनमुन दत्ताने गायक केके यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना लिहिले, “माझ्यासारख्या प्रत्येक संगीतप्रेमीसाठी धक्कादायक आहे. देवा काय होत आहे. जीवन खूप अप्रत्याशित आहे. ओम शांती.”
प्रसिद्ध गायक अरमान मलिकने ट्विट केले आणि लिहिले, “आणखी एक धक्कादायक हानी आणि आपल्या सर्वांसाठी अतिशय दुःखद घटना. विश्वास बसत नाही की आमचे केके सर राहिले नाहीत… काय होत आहे.
कष्णकुमार कुन्नाथ उर्फ केके हे चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायक होते. केकेने त्यांच्या आवाजात अनेक गाणी गायली. त्यांनी मराठी, बंगाली, गुजराती, तेलुगु, मल्याळम, कन्नड आणि तमिळ गाण्यांना आवाज दिला. तर त्यांनी आवाज दिलेल्या हिंदी चित्रपटातील गाणी हिट झाली
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम