किर्ती आरोटे
द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : आज देशभर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा झाला. अनेकांनी “हर घर तिरंगा” अभियानाच्या माध्यमातुन घरोघरी राष्ट्रध्वज लावण्यात आला. अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांच आयोजन करण्यात आले तर कुठे रॅलीचं आयोजन करण्यात आलं. थोडक्यात काय तर देशाचा 75 वा स्वातंत्र्य महोत्सव मोठ्या थाटात आणि अभिमानाने साजरा करण्यात आला.
मात्र भारतात असाही एक वर्ग आहे ज्या वर्गाला कदाचित स्वातंत्र्याचा अर्थही माहित नसावा एक असा वर्ग ज्या वर्गाकडे कदाचित स्वतःच घरही नसणार अशा वर्गासाठी नृत्यकलाकार सिद्धेश पाय पुढे सरसवला आहे. डान्स इंडिया डान्स या रियालिटी शो च्या माध्यमातून घराघरात आपली ओळख निर्माण करणारे नृत्यकलाकार सिद्धेश पाय यांनी आज स्वातंत्र्यदिनानिमित्त गरीब मुलांना अन्न वाटप करून सिद्धेश यांनी आपला स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला.
खरंतर कोव्हीड काळातच माझ्या मनात या गरीब जनतेला सहायता करण्याची इच्छा निर्माण झाली होती. 15 ऑगस्ट हा वर्षभरातील सर्वोत्तम दिवस आहे तथापि योगायोगाने माझा वाढदिवसही याच दिवशी येतो. सर्वसामान्य गरीब जनतेस अन्नदानातुन गरीब जनतेचा आशीर्वादही मिळतो. शिवाय लहान निरागस मुलांचा आनंद पाहुन मला माझे लहानपण आठवते अशी प्रतिक्रिया सिद्धेश यांनी द पॉईंट नाऊ बरोबर बोलतांना दिली.
आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने दारू पार्ट्या कमी करून, महागड्या हॉटेल्स मध्ये जाण्याऐवजी अशा जनतेस साह्य करण्यासाठी प्रयत्नशील असावे असा संदेशही यावेळी त्यांनी दिला.
भारतात कुपोषण, उपासमार, गरिबी पूर्णपणे दूर होईल त्यादिवशी देशाला खऱ्या अर्थाने पूर्णतः स्वातंत्र्य मिळेल.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम