Shri Ram Mandir: अयोध्येत श्री रामाच्या मूर्तीचा प्रतिष्ठापणा मुहूर्त ठरला..!

0
20

Shri Ram Mandir: अयोध्येत श्रीराम मंदिराच्या उभारणीचे काम जलद गतीने सुरु आहे. सर्वांना प्रतीक्षा लागली होती ते भगवान श्रीरामाच्या प्राण प्रतिष्ठापनेची. याचा मुहूर्त निश्चित झाला आहे. २२ जानेवारी रोजी मंदिरात श्री रामाच्या मूर्तीची प्राण-प्रतिष्ठापणा होणार आहे. (Shri Ram Mandir)

Mumbai news: मुंबईत १५९ ठिकाणी ‘स्वच्छता हीच सेवा’ अंतर्गत सामूहिक श्रमदान..!

तीन मजली राम मंदिराच्या तळमजल्याचे बांधकाम डिसेंबर अखेर पूर्ण होईल आणि सोहळा होणार आहे, असे मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी सांगितले. श्रीराम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास जी महाराज यांनी सांगितले की, १५ जानेवारी ते २४ जानेवारी या कालावधीत धार्मिक विधी होणार आहेत. आमच्या वतीने पंतप्रधान कार्यालयाला पत्र लिहिण्यात आले असून त्याचे उत्तरही मिळाले आहे. आता २२ सप्टेंबर रोजी पंतप्रधान मोदी अयोध्येत येणार असतील तर २२ सप्टेंबर रोजी प्राणप्रतिष्ठा होणार हे निश्चित झाले आहे. या कार्यक्रमासाठी आणखी लोकांना आमंत्रित करण्यात आले आहे. (Shri Ram Mandir)

मंदिराच्या शिखरावर बसवण्यात येणारे उपकरण तयार करण्याचे काम सुरू आहे, ज्याद्वारे प्रत्येक वर्षी रामनवमीच्या दिवशी गर्भगृहातील देवतेच्या कपाळावर सूर्याची किरणे क्षणभर पडतील. ते बेंगळुरूमध्ये बनवले जात आहे आणि त्याची डिझाइन शास्त्रज्ञांच्या देखरेखी खाली होत आहे, असेही नृपेंद्र मिश्रा म्हणाले.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here