ठाणे : राज्यात सत्ता संघर्ष शिगेला गेला असून मोठ्या प्रमाणात वाद विकोपाला गेला आहे. एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केल्यापासून उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून पलटवार सुरूच आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्यावरून आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. यासाठी पोलिसांनी आता उद्धव ठाकरे गटातील सात नेत्यांवर एफआयआर दाखल केला आहे. या सर्व नेत्यांवर भावना भडकावल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
ज्या लोकांवर एफआयआर नोंदवण्यात आला ते पुढील प्रमाणे
ठाणे संपर्क प्रमुख व माजी नगरसेवक मधुकर देशमुख
ठाणे महिला आघाडी अध्यक्षा अनिता बिर्जे
राजन राजे, धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष
खासदार आणि शिवसेना सचिव विनायक राऊत
शिवसेना उपनेत्या सुषमाताई अंधारे
आमदार आणि शिवसेना नेते भास्कर जाधव
आणि सचिन चव्हाण
भावना भडकावल्याबद्दल पोलिसांनी कलम 153ही कलम लागू केले आहे.
पीएम मोदींची कॉपी करणे, सीएम शिंदे यांची कॉपी करणे आणि त्यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी करणे यासह भाजप नेते नारायण राणे यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी सर्व नेत्यांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. लोकांच्या भावना भडकावल्याबद्दल पोलिसांनी सर्व नेत्यांविरोधात कलम 153 लागू केली आहे.
9 ऑक्टोबर रोजी उद्धव ठाकरे गटाच्या परिषदेत भाष्य केल्याचा आरोप
ठाण्यातील गडकरी रंगायतन हॉलमध्ये 9 ऑक्टोबर रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केलेल्या महाप्रबोधन यात्रेत शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींची नक्कल करत त्यांची खिल्ली उडवली होती, तर भास्कर जाधव यांनी सीएम शिंदे यांची नक्कल केली होती. या प्रकरणी ठाण्यातील नौपाडा पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला असून, त्यात सुषमा अंधारे, भास्कर जाधव यांच्यासह सात जणांची नावे आहेत. यापूर्वी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्याविरोधात औरंगाबादमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला होता.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम