– समृध्दी ठाकरे
Shivsena: नारीशक्ती वंदन अधिनियम २०२३ संदर्भात लोकसभेत झालेल्या मतदानाच्या वेळी अनुपस्थित शिवसेनेचा व्हीप डावलणाऱ्या खासदारांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा शिवसेना लोकसभा गटनेते खासदार राहुल शेवाळे यांनी दिला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला समर्थन करणाऱ्या विनायक राऊत, राजन विचारे, ओमराजे निंबाळकर आणि संजय जाधव या चार खासदारांचे निलंबन करण्याबाबतही कायदेशीर सल्ला घेत असून, याबाबत लोकसभा अध्यक्षांना देखील निवेदन देणार असल्याचे शेवाळे (Rahul Shewale) यांनी स्पष्ट केले.
Google news:आपल्या लाडक्या गुगलचा २५ वा वाढदिवस..!
‘बाळासाहेब ठाकरे भवन’ येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शेवाळे म्हणाले की, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काँग्रेसप्रणीत आघाडीतील सर्व खासदारांनी महिला आरक्षण विधेयकाला समर्थन दिल्याचे जाहीर केले होते. मात्र, वस्तुस्थिती वेगळी आहे. त्यांच्या आघाडीतील अनेक खासदार या विधेयकाच्या मतदानादरम्यान अनुपस्थित होते. लोकसभेत शिवसेना पक्षाचे प्रतोद पद खासदार भावना गवळी यांच्याकडे असून त्यांनी जारी केलेला व्हीप शिवसेनेच्या सर्व खासदारांना बंधनकारक आहे. (Shivsena)
१८ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर दरम्यान आयोजित केलेल्या विशेष अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी खासदार गवळी त्यांनी पक्षाच्या वतीने सर्व खासदारांना व्हीप जारी केला होता. मात्र उबाठा गटाला समर्थन करणाऱ्या चार खासदारांनी या व्हीपचे उल्लंघन केले. बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमीच महिला आरक्षणाच्या समर्थनाची भूमिका घेतली होती. पण त्यांच्या विचारांचा वारसा सांगणारे हे चार खासदार महिला आरक्षण विधेयक विषयी मतदानाच्या वेळी सभागृहात उपस्थित नव्हते, ही लाजिरवाणी आणि दुर्देवी घटना आहे. यापैकी खासदार ओमराजे निंबाळकर आणि खासदार हे तर दिल्लीमध्ये असूनही ते सभागृहात आले नाहीत. महिलांचा अवमान करणाऱ्या या खासदारांना जनता त्यांची जागा दाखवून देईल, असेही शेवाळे म्हणाले. (Shivsena)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम