नाशिक : दसरा मेळाव्याला गालबोट लागल्याचे चिन्हे निर्माण झाले आहेत कट्टर शिवसैनिक विरुद्ध गद्दार अशा स्वरूपाचे दोन गट निर्माण झाले असून त्याचे पडसाद देखील आज्ज सुरू झाले आहेत. अनेक ठिकाणी शाब्दिक चकमक होत वाद निर्माण झाले आहेत. शिवसेनेतील ( Shivsena) फुटीमुळे यंदाच्या वर्षी मुंबईत दोन दसरा मेळावे होत असून पोलिसांचे कौशल्य पणाला लागले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाचा दसरा मेळावा परंपरेनुसार शिवाजी पार्कला मैदानावर तर एकनाथ शिंदे यांच्या गटाचा BKC च्या मैदानात मेळाव्याची तयारी सुरू आहे. यामुळे मुंबईत आज मोठा बंदोबस्त ठेवला आहे.
शिंदे व ठाकरे या दोन्ही गटांच्या मेळाव्यांसाठी राज्यभरातून लाखो शिवसैनिक मुंबईला रवाना झाले आहेत. या मेळाव्यासाठी कोट्यवधी रुपयांचा चुराडा करण्यात आला आहे. यात नाशिकहून निघालेल्या शिवसेना उद्धव ठाकरे गट तसेच शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये शहापूर या ठिकाणी जोरदार राडा झाल्याची प्रार्थमिक माहिती आहे, यांमुळे वादाची ठिणगी पडली आहे. शिवसेनेच्या गाडीतील महिलेकडे पाहून अश्लील हावभाव केल्याने हा प्रकार घडल्याचे समजते. यात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना चोप दिल्याची माहिती देखील समोर आली आहे.
मुंबईकडे येत असताना शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाच्याकार्यकर्त्यांची गाडी थांबवली अन् शिंदे-ठाकरे समर्थकांमध्ये जोरदार राडा झाला. या दरम्यान सांगण्यात येत आहे की शिंदे गटाच्या गाडीतून शिवसेनेच्या गाडीतील महिलेकडे बघून अश्लील हावभाव करण्यात आले यामुळे हा प्रकार घडला आहे अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. नाशिक मुंबई दरम्यान ही घटना घडली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम