शिवराजे मित्र मंडळ आयोजित बुस्टर डोस शिबीराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0
31

देवळा: शिवराजे मित्र मंडळ कळवण रोड देवळा तर्फे गणेशोत्सवानिमित्त दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी ही सामाजिक काम अविरतपणे चालू ठेवले आहे. कुठलाही स्वार्थ मनात न ठेवता मंडळाने सलग १९ व्या वर्षी ही विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवित समाजापुढे एक आदर्श निर्माण करुन दिला आहे.

गेल्या २ वर्ष कोरोना ह्या महाकाय आजाराने सर्व जगाला ठप्प केले होते. ह्या आजाराला हरविण्यासाठी त्यावर उपाय म्हणून लसी दिल्या गेल्या. त्यात तिसरी लस म्हणजेच बुस्टर डोस अजुनही काही नागरिकांनी घेतल्या नाहीत. हे लक्षात घेता मंडळातर्फे दि. ५ /०९ / २०२२ सोमवारी बुस्टर डोस शिबीर संपन्न झाले. तब्बल ८० नागरिकांनी ह्या शिबीराचा लाभ घेतला.

यावेळी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष किरण आहेर, नगरसेवक संतोष शिंदे, जितेंद्र आव्हाड युवा मंच चे नाशिक जिल्हाध्यक्ष सचिन सूर्यवंशी, मधुकर बापु आहेर, श्रावण आढाव, सुनिल आहेर, वसंत आढाव, रमेश गवळी, सुभाष आढाव, भरत आढाव, शिवराजे मित्र मंडळाचे अध्यक्ष रुपेश आहेर, उपाध्यक्ष रितेश निकम, खजिनदार रोहन निकम, चेतन भदाने, प्रसाद मुसळे, भैय्या आढाव, किरन आढाव, हितेश पगार, शुभम आहेर, केतन भामरे, भुशन आहेर, सत्यम आहेर आदि सदस्य उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here