शिवराजे मित्रमंडळातर्फे आज वृक्षारोपण रविवारी रक्तदान

0
6

देवळा: गणेशोत्सव हा फक्त देखावे किंवा मनोरंजन करणारा नसून तो एक समाजात आदर्श निर्माण करणारा असल्याचे देवळा येथील तरुणाईने दाखवून दिले. समाजाचे काही तरी देणे लागतो हे उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवून देवळा येथील सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे शिवराजे मित्र मंडळ, कळवण रोडच्या तरुणाईने या वर्षीही वृक्षारोपन कार्यक्रम आयोजित करत एक अनोखा संदेश दिला आहे.

मंडळाला १९ वर्ष पुर्ण झाल्याने भारतीय प्रजातीच्या १९ वृक्षांची लागवड केली आहे. देवळा येथील आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह परीसरात ही लागवड करण्यात आली आहे.  दिवसेंदिवस कमी होत चाललेली वृक्ष तसेच वाढते प्रदुषण ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वृक्षलागवड गरजेची आहे म्हणुनच ह्या वर्षापासून शिवराजे मित्र मंडळाने दरवर्षी वृक्षारोपन करण्याचा संकल्प केला आहे.

 

पर्यावरण जनजागृती तरुणाईच्या मनात रुजवणे गरजेचं,

देवळा तालुक्यातील तरुण मित्रांनी एकत्र येत तालुक्यात निसर्गाचे सौंदर्य राखण्यासाठी पुढाकार घेणे काळाची गरज आहे. अवेळी पाऊस, उष्णमघात यामुळे सजीव सृष्टीचे आयुर्मान घटले असून हे जपण्यासाठी निसर्ग वाचवण्यासाठी तरुणाईने एकत्रित यावे हीच खरी श्री गणेशाची भक्ती ठरेल.

– किरण आहेर,शिवराज्य मित्रमंडळ स.अध्यक्ष

सुनील आहेर यांनी विविध प्रकारचे भारतीय वृक्ष उपलब्ध करून दिले. या कार्यक्रमा प्रसंगी शिवराजे मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष किरण आहेर, अध्यक्ष रुपेश आहेर, उपाध्यक्ष रितेश निकम, खजिनदार रोहन निकम, जेष्ठ सदस्य जितेंद्र वराडे, चेतन भदाणे, भैय्या आढाव, प्रसाद मुसळे, हर्षल आहेर, किरण आढाव, केतन भामरे, सागर धात्रक, सुरज आढाव, हितेश पगार, शुभम आहेर, दिपेश देवरे, यश बागुल, प्रशांत शिंदे, तेजस गांगुर्डे, गौरव जाधव, यश आढाव आदि सदस्य मोठ्या संखेने उपस्थित होते.

या मंडळातर्फे उद्या दि. ४/९/२०२२ रोजी रक्तदान शिबिर तसेच दि. ५/९/२०२२ रोजी बुस्टर डोस शिबीर आयोजित केले आहे. तरी सर्व गणेश भक्तांनी शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाचे संस्थापक अध्यक्ष किरण आहेर यांनी केले आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here