‘हसणारे’ खूप असतात, ‘हसवणारे’ होऊया…!; शिवनिश्चल ट्रस्टचे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

0
38

देवळा: 2022 या वर्षाला निरोप देताना राज्यात अनेक ठिकाणी धिंगाणा घालताना तरूणाई दिसून येत आहे. देशात एका बाजूला उन्माद तर दुसऱ्या बाजूला एकावेळेच्या जेवणाची पंचायत ही परिस्थीती आजही आपल्या देशात आहे. शिक्षणाचा देखील बाजार उठलेला दिसतो. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कलागुण असून देखील विद्यार्थी परिस्थिती अभावी शिक्षणापासून वंचित राहत असतात. अनेकांना शालेय साहित्य देखील वेळेत मिळत नाही यामुळे देशात मोठी दरी निर्माण होत आहे.

देशातील सामाजिक दरी मिटवून चांगला आदर्श घडवण्यासाठी अनेक युवक तसेच संस्था काम करत असतात याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रातील शिवनिश्चल ट्रस्ट च्या माध्यमातून किल्ले धोडपच्या पायथ्याशी असणार्‍या भागात 67 मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून 31 डिसेंबर साजरा करण्यात आला. त्याचसोबत आईवडील नसणार्‍या या दोन विद्यार्थिनींना आर्थिक मदत करण्यात आली.

इतरांना ‘हसणारे’ खूप असतात, आपण ‘हसवणारे’ होऊया…! असे म्हणत शिवनिश्चल ट्रस्टचे अध्यक्ष यशवंत गोसावी यांनी या उपक्रमाच्या माध्यमातून नवीन वर्षाची सर्वात एका आदिवासी पाड्यावर केल्याने स्थानिकांनी कौतुक करत या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या आहेत. शैक्षणिक साहित्य वाटप करतांना पुढील वर्षाची देखील आखणी केली असून गावातील अनाथ मुलांना दत्तक घेण्याचा निर्धार केला आहे. उपक्रमाचे ग्रामस्थांनी कौतुक करत गावाची निवड केल्याने आभार मानले आहेत.

यावेळी डॉ. डि.के आहेर, डॉ. सुनील आहेर, भगवान आहेर, अनिल भामरे, पंकज जाधव, पत्रकार अंकुश सोनवणे, देवेंद्र बच्छाव, सूरज अहिरे, मयूर बागूल, मोहित वाघ, रोशन बागूल, लाला बच्छाव, विवेक अहिरे, केतन आहेर, ललित जाधव, गणेश सोनवणे, विठाबाई शेवाळे ग्रामस्थ तसेच जि. प शाळा हनुमंतपाड्याचे शिक्षवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here