सोशल मीडियावर मशाल प्रचंड व्हायरल झाली असून मुख्यमंत्री शिंदे यांच्या फेसबुक पेजवर कमेंट्स चा पाऊस पडला आहे. उद्धव ठाकरे समर्थक अधिक आक्रमक झाले असून त्यांनी बंडखोर आमदारांना धारेवर धरले आहे. जुन्नरचे शरद सोनवणे तसेच अन्य आमदारांच्या वॉल वर जात शिवसैनिकांनी आँनलाईन राडा केला असून मोठ्या प्रमाणात ट्रोल केले आहे. यामुळे शिंदे गटाच्या आमदारांमध्ये टेन्शन मात्र वाढले आहे. शिवसैनिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याने अनेक आमदारांची डोकेदुखी वाढली आहे.
निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाला ‘मशाल’ हे निवडणूक चिन्ह दिले आहे. उद्धव ठाकरे गटाच्या पक्षाचे नाव ‘शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे’ असे असेल. निवडणूक आयोगाने (ECI) उध्दव ठाकरे गटाला अंतरिम आदेशानुसार आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ज्वलंत मशाल चिन्हाचे वाटप केले आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर उद्धव ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव म्हणाले की, हा मोठा विजय आहे आम्हाला आनंद होत असून आम्ही गड्डारीला नेस्तनाबूत करू अशा प्रकारे ठणकावले आहे.
त्याचवेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे नाव बाळासाहेबांची शिवसेना असे असेल. एकनाथ शिंदे-गट यांनी चिन्हाबाबत पाठवलेल्या तीन सूचना केंद्रीय निवडणूक आयोगाने स्वीकारल्या नाहीत. यापूर्वी सोमवारी उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गटाने निवडणूक आयोगाला तीन पर्यायी चिन्हे आणि नावे दिली होती.
शिंदे गटाला नवीन निवडणूक चिन्हे द्यावी लागणार आहेत
यानंतर निवडणूक आयोगाने या चिन्हांची आणि नावांची चौकशी केली. शिवसेनेच्या प्रतिस्पर्धी गटाला निवडणूक चिन्ह म्हणून त्रिशूल आणि गदा देण्यास निवडणूक आयोगाने धार्मिक अर्थाचा हवाला देत नकार दिला. निवडणूक आयोगाने शिंदे गटाला उद्या, ११ ऑक्टोबरपर्यंत ३ नवीन चिन्हांची यादी देण्यास सांगितले आहे.
शिवसेनेचे निवडणूक चिन्ह गोठवण्यात आले
पक्षात सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने शनिवारी (8 ऑक्टोबर) शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले होते. आयोगाने 3 नोव्हेंबर रोजी अंधेरी (पूर्व) विधानसभा जागेच्या आगामी पोटनिवडणुकीत पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह ‘ धनुष्यबाण’ वापरण्यास दोन्ही पक्षांना बंदी घातली होती.
उद्धव ठाकरे गटाने ही नावे दिली
यानंतर, निवडणूक आयोगाने (ECI) दोन्ही गटांना आपापल्या पक्षांसाठी तीन नवीन नावे आणि चिन्हे सांगण्यास सांगितले होते. उद्धव ठाकरे गटाच्या वतीने ‘त्रिशूल’, ‘मशाल’ आणि ‘उगता सूरज’ ही चिन्हे निवडणूक आयोगाला देण्यात आली. तसेच पक्षाच्या नावाप्रमाणे ‘शिवसेना (बाळासाहेब ठाकरे)’, ‘शिवसेना (प्रबोधनकार ठाकरे)’ किंवा ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ असे पर्याय देण्यात आले होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम