जमलेल्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो….! ; हे वाक्य पेलण्याची ताकद ठाकरेंच्याच धमन्यात

0
56

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून राजकारण! शिंदे गट हायजॅक करण्याच्या तयारीत आहे का?

मुंबई : ‘जमलेल्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो’ ही शिवगर्जना शिवाजी पार्क येथे लाखो शिवसैनिकांना ऊर्जा देणारी ठरते हे वाक्य म्हणजे करोडो शिवसैनिकांना मंत्ररुपी ऊर्जाच असते, हा आवेश हा जोश हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरें नंतर कोनामध्ये असेल ती उद्धव ठाकरे यांच्या कडे मात्र आता या परंपरेला एकनाथ शिंदे आवाहन देण्याचा प्रयत्न करत आहेत. शिवाजी पार्कवर लाखोंचा जनसमुदाय हा ठाकरे या आडनावावर प्रेम करणारे असतात अन् त्यांच्या धमण्यात ही ताकद आहे. मात्र एकनाथ शिंदे दसरा मेळावा घेऊन नेमक काय बोलणार ते तेवढे सक्षम आहेत का ? अशा असंख्य चर्चांना उधाण आले आहे.

यंदा महाराष्ट्रात नवा गदारोळ सुरू होणार आहे, कारण शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात दसऱ्यावरून राजकारण सुरू झाले आहे. यंदा मुंबईच्या शिवाजी पार्कवर दसरा मेळावा होणार का? शिंदे गट आता दसरा मेळावा हायजॅक करण्याच्या तयारीत आहे का? हे असे प्रश्न आहेत ज्यावर सध्या सस्पेन्स कायम आहे. शिवसेना आणि दसऱ्याच्या सभेचे अतूट नाते आहे. दरवर्षी दसऱ्याला दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर होणाऱ्या शिवसेनेच्या मेळाव्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक येतात. ‘खऱ्या शिवसेना’बाबत सुरू असलेला वाद कोर्टात आहे, अशा स्थितीत दसरा मेळाव्याबाबत उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून मंजुरी मागण्यात आली आहे.

शिंदे गट आणि उद्धव गटाचे नेते एकमेकांविरोधात वक्तव्ये करत आहेत. दरम्यान, दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी शिवसेनेने 22 ऑगस्ट रोजी मुंबई महापालिकेकडे (BMC) अर्ज केला आहे. मात्र, अद्यापपर्यंत बीएमसीच्या उत्तर विभागाकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. त्याचवेळी मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनाही हा अर्ज देण्यात आला होता, मात्र त्यांनीही अद्याप काहीही सांगितलेले नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे यांची गटबाजीही त्यात रस घेत असल्याची शक्यता बळावली आहे.

शिवसेनेला काय म्हणायचे आहे?
मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर म्हणाले की, दसरा मेळाव्याबाबत बीएमसीने आपली भूमिका स्पष्ट करावी. शिवसेनेबाबत न्यायालय निर्णय घेईल, पण बीएमसीचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. त्यामुळे त्याने दबावात येऊ नये. शिंदे गटावर निशाणा साधत किशोरी पेडणेकर म्हणाल्या, ‘डर्टी ट्रिक्स खेळण्याचा प्रयत्न करू नका. दसरा मेळावा ही शिवसेनेची 56 वर्षांची परंपरा आहे, ती मोडता कामा नये.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here