Skip to content

शिवसेनेत आईचे दूध विकणारी अवलाद नाही ; भाजपाने बळजबरीने सुरतमध्ये आमदारांना डांबले


आमदार पुन्हा संपर्क करत असून काही आमदारांना गैरसमजातून बाहेर नेण्यात आले, एकनाथ शिंदे सोबत संपर्क झाला आहे. संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे. संशयास्पद वातावरण निर्माण झाले आहे मात्र सर्व शमेल सर्व नेते एकमेकांच्या संपर्कात आहेत.

महाराष्ट्रात राजस्थान सारखे सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरू मात्र सरकार मजबूत आहे. महाराष्ट्र दुबळा होणार नाही. मुंबई वर ताबा मिळवण्यासाठी भाजपाचे हे सर्व सुरू, सेनेत आईचे दूध विकणारी अवलाद निर्माण होणार नाही. महाराष्ट्राच्या पाठीत खंबीर खुपणारी अवलादी बाहेर पडले त्यांचे हाल झाले आहेत. अनेक आमदार बाहेर गेलेत त्यांना बळजबरीने आणण्यात आले आहे. आर सी पाटील यांनी त्यांची व्यवस्था केली आहे. संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले आहेत.

सर्व आमदारांसह आमचे बोलणे सुरू असून मविआ सरकार पडणार नाही असे देखील राऊत म्हणाले, एकनाथ शिंदे हे कडवट शिवसैनिक आहेत. बाळासाहेबांवर त्यांची निष्ठा आहे. अनिल परब यांना आज नोटीस पाठवण्यात आली हे सर्व ठरवून केले आहे. मात्र सरकार डगमगणार नाही.

ठाकरे सरकार पडण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. मात्र ते होणार नाही शिवसैनिकांना विकत घेणं कोणाच्या बापाला जमणार नाही.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!