देवळा सार्वजनिक शिवजयंती अध्यक्षपदी नानु आहेर तर खजिनदार पदी मनोज आहेर

0
25

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी (देवळा) : देवळा शहर सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या अध्यक्षपदी योगेश उर्फ नानू आहेर यांची तर उपाध्यक्ष पदी विश्वनाथ गुंजाळ व उमेश आहेर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

येत्या १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती असून, त्या पार्श्वभूमीवर रविवार (दि ६) रोजी शिवस्मारक समितीचे अध्यक्ष केदा नाना आहेर यांच्या अध्यक्षतेखाली शिवजयंतीनिमित्त बैठक घेण्यात आली. यावेळी सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या अध्यक्षपदी योगेश उर्फ नानू आहेर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली .

उर्वरित कार्यकारणी पुढीलप्रमाणे

उपाध्यक्ष -विश्वनाथ गुंजाळ, उमेश आहेर,

खजिनदार – नगरसेवक मनोज आहेर,

सचिव – कांदा व्यापारी अमोल आहेर,

कार्यकारणी सदस्य – नगरसेवक संतोष शिंदे, अशोक आहेर, संभाजी आहेर, कैलास पवा आदींसह लक्ष्मीकांत आहेर, डॉ प्रशांत निकम, अतुल पवार, दिलीप आहेर, पंकज आहेर, आण्णा आहेर, मनोज गुजरे, जगन आहेर, रोशन अलिटकर, अनिल आहेर, योगेश वाघमारे, समाधान आहेर, तुषार आहेर आदींची निवड करण्यात आली . यावेळी नगरसेवक जितेंद्र आहेर, भाऊसाहेब पगार आदी उपस्थित होते . नवनिर्वाचित कार्यकारिणीचे शिवप्रेमींनी अभिनंदन केले आहे .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here