The point now – बॉलिवूडचे अनेक स्टार्स आहेत जे चित्रपटसृष्टीशिवाय त्यांनी आणेक व्यवसायातही हात आजमावला आहे. त्या स्टार्सच्या यादीत शिल्पा शेट्टीच्या नावाचाही समावेश झाला आहे. अभिनयाव्यतिरिक्त शिल्पा शेट्टीला आपण रियालिटी शोमध्ये जज म्हणून पाहिले आहे. याशिवाय ती यूट्यूब चॅनल आणि सोशल मीडिया अकाउंटवरून योगा आणि कुकिंग टिप्स देताना दिसत आहे. आता शिल्पा शेट्टीने मुंबईत पिझ्झा रेस्टॉरंट सुरू केले आहे, ज्याची एक झलक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आजकाल शिल्पा शेट्टीचा एक व्हिडिओ इंटरनेटवर चर्चेत आहे ज्यामध्ये ती तिच्या रेस्टॉरंटच्या बाहेर पापाराझींना पिझ्झा खायला घालताना दिसत आहे.
शिल्पा शेट्टीच्या व्यावसायिक आयुष्यात नवे वळण आले आहे. अभिनयाव्यतिरिक्त शिल्पा शेट्टीने नुकतेच मुंबईत पिझ्झा रेस्टॉरंट उघडले आहे. शिल्पा शेट्टीच्या या पिझ्झा रेस्टॉरंटचे नाव ‘बिझा’ आहे. दरम्यान शिल्पा शेट्टीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या व्हिडिओमध्ये शिल्पा तिचे नवीन रेस्टॉरंट उघडल्यानंतर बाहेर उभ्या असलेल्या पापाराझींना पिझ्झा वाटताना दिसत आहे.
शिल्पा तिच्या नवीन रेस्टॉरंटच्या ओपनिंगमध्ये मुलगा विआन आणि मुलगी समिशासोबत पोज देताना दिसली. शिल्पा शेट्टी तिच्या स्टाइल स्टेटमेंटसाठीही ओळखली जाते. प्रसंग कोणताही असो शिल्पा तिच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेते. ‘बिझा’च्या ओपनिंगमध्येही शिल्पा शेट्टीने तिच्या फॅशन सेन्सने चाहत्यांची मने जिंकली. रेस्टॉरंट ओपनिंगमध्ये शिल्पा अगदी सिंपल लूकमध्ये दिसली. शिल्पाने लाल रंगाचा ट्युनिक ड्रेस परिधान केला होता. तिचा लूक पूर्ण करण्यासाठी अभिनेत्रीने बांगड्या घातल्या आणि केस उघडे ठेवले. शिल्पा शेट्टीचा हा व्हिडिओ इन्स्टंट बॉलीवूडच्या अधिकृत इन्स्टा हँडलवरून शेअर करण्यात आला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम