शेअर बाजार : सेन्सेक्स १६८ अंकांनी तर निफ्टी ३१ अंकांनी घसरले

0
15

मुंबई – आंतरराष्ट्रीय शेअर बाजारात सातत्याने होत असलेल्या घसरणामुळे भारतीय शेअर बाजारावर त्याचा परिणाम होत असल्याचे आज दिसून आले. आज सेन्सेक्समध्ये १६८ अंकांची तर निफ्टीमध्ये ३१ अंकांची घसरण झाली.

त्यामुळे आज सेन्सेक्समध्ये ५९,०२८ अंकांवर स्थिरावला. तर निफ्टी १७,६२४ अंकांवर पोहोचला. शेअर बाजारात आज जवळपास २०७३ कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली तर १२८९ कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. मात्र, १२१ कंपन्यांच्या शेअर्समध्ये आज कोणताही बदल झालेला नाही.

शेअर बाजारात आजच्या दिवसाची सुरुवात ही घसरणीने झाली होती. सकाळच्या सुमारास सेन्सेक्स ४७४ अंकांच्या घसरणीने ५८,७२२.८९ अंकांवर आला, तर निफ्टी १७१.३ अंकांनी घसरून १७,४८४.३० वर व्यवहार करत होता. आज दोन्ही बाजारात ऑटो आणि रिअॅलिटी इंडेक्समध्ये विक्री झाली तर FMCG, आयटी आणि फार्मा कंपन्यांच्या इंडेक्समध्ये खरेदी झाल्याचे दिसून आले. ह्यात कोल इंडिया, अदानी फोर्ट, अल्ट्राटेक सिमेंट, ब्रिटानिया यांचे शेअर्स वधारले आहे. तर टाटा मोटर्स, बजाज ऑटो, मारुती सुझुकी ह्यांच्या शेअर्समध्ये घट झाली.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here