द पॉईंट नाऊ ब्युरो : राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज पुन्हा भेट झाली. ज्यात अनेक मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.
शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत, एवढ्या मोठ्या प्रमाणावर बंड झाले, याची शिवसेना नेतृत्वाला पुसटशीही कल्पना नव्हती का? असा प्रश्न केल्याचे सांगण्यात येत आहे.
शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत मिळून उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत पवार आणि ठाकरे यांच्यात बराच वेळ गहन चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. बैठकीत शरद पवार यांनी ठाकरे यांना थेट प्रश्न विचारून या झालेल्या बंडाबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. एवढ्या मोठ्या बंडखोरीबाबत शिवसेना नेतृत्वाला कल्पना नसणे, वर्षा बंगल्यावर बैठकीस उपस्थित राहिल्यानंतर, नेत्यांनी बंड करून गुवाहाटीला जाणे हे विचित्र असल्याचे शरद पवारांनी म्हटल्याचे सांगण्यात येत आहे.
या भेटीबाबत आणि त्यात या मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत असल्याने, आता पुढे महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी काय पाऊले उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शरद पवार यांनी याआधी कायदेविषयक तयारीसाठी म्हणून देखील बैठक घेतली होती. महाविकास आघाडीचे महाराष्ट्रातील हे सरकार वाचवण्याची पूर्ण पराकाष्ठा केली जात आहे. यामुळे आता काय चित्र उभे राहते हे लवकरच समजेल.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम