शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालयाकडून रक्तदान शिबीराचे आयोजन

0
38

द पॉइंट नाऊ : शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालयातील चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यी व एच.डी .एफ.सी.बँक, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण कृषि कार्यानुभव या कार्यक्रमाअंतर्गत रक्तदान शिबीर निगुंडळ येथील जिल्हा परीषद शाळेत आयोजित करण्यात आले.

या कार्यक्रमास निगुंडळ येथील ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ग्रामस्थांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचा उत्तम आदर्श समाजासमोर ठेवला.या कार्यक्रमास गावच्या सरपंच दीप्ती गिजे, उपसरपंच सुभाष गावडे ,ग्रामपंचायत सदस्य मयुरेश भागवत, रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाचे कर्मचारी मान्यवर उपस्थित होते.

सदरच्या कार्यक्रमास शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनितकुमार पाटील, विभाग प्रमुख प्रा.हरिश्चंद्र भागडे ,ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम अधिकारी प्रा.पी.बी.पाटील, प्रा.निशिकांत पाकळे, विषयतज्ज्ञ प्रा.संग्राम ढेरे यांचे मार्गदर्शन लाभले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयदीप पगार , हर्ष प्रकाश शेटकर, ऋषभ किशोर दळवी, शुभम निकम, सागर शंकर दळवी, हृदय नायडू या विद्यार्थ्यानी परिश्रम घेतले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here