आशिया चषक सुरु होण्यापूर्वी पाकिस्तानला मोठा धक्का, मुख्य गोलंदाज स्पर्धेबाहेर !

0
30

दिल्ली – आशिया चषक सुरू होण्याच्या अवघा आठवडाच उरला असताना पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. कारण संघाचा मुख्य गोलंदाज  असलेला शाहीन आफ्रिदी यंदाच्या स्पर्धेतून बाहेर पडला आहे, तसेच त्याच्या आगामी टी२० विश्वचषकाच्या खेळण्यावरही प्रश्नचिन्हे उभी राहिली आहे.

वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी सध्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. डॉक्टरांनी शाहिनला जवळपास ४ ते ६ आठवडे विश्रांती घेण्यास सांगितले आहे. आफ्रिदीच्या एक्झिटचा अर्थ म्हणजे दोन प्रमुख गोलंदाज यंदाच्या आशिया चषकमध्ये दिसणार नाहीत. याअगोदर भारताचा जसप्रीत बुमराहही स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

तसेच तो आगामी आशिया चषकासह इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतही खेळणार नाही. गाले येथे झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण करताना आफ्रिदीला ही दुखापत झाली होती. पाकिस्तानचा संघ सध्या नेदरलँडमध्ये आहे. शाहीन आपले रिहॅबिलिटेशन पूर्ण करण्यासाठी संघासोबतच असणार आहे. शाहीनच्या बदली खेळाडूची घोषणा लवकरच संघाकडून केली जाणार आहे. पाकिस्तानचा संघ सोमवारी दुबईला पोहोचणार आहे.

भारताविरुद्ध स्पर्धेचा पहिला सामना

 

२७ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या स्पर्धेत पाकिस्तानचा पहिला सामना भारताविरुद्ध होणार असून २८ ऑगस्टला दुबईत हा सामना खेळवला जाईल. या दोन्ही संघांना अ गटात ठेवण्यात आले आहे. गटामध्ये भारत आणि पाकिस्तान व्यतिरिक्त पात्रता फेरी जिंकणारा संघ या गटात प्रवेश करेल. श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांना ब गटात ठेवण्यात आले आहे. २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीत ही स्पर्धा होणार आहेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here