Delhi : 72 हुरें चित्रपट पुन्हा वादाच्या भोवऱ्यात…

0
17

Delhi : ‘७२ हुरें’ हा चित्रपट ७ जुलै २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. मात्र, हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच चर्चेत आहे. आता सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाच्या ट्रेलरला प्रमाणपत्र देण्यास नकार दिला असून हा निर्णय ऐकून सहनिर्माते अशोक पंडित संतापले आहेत. धर्माच्या नावाखाली पसरवल्या जाणाऱ्या दहशतवादाचा चेहरा समोर आणणारा हा नवीन चित्रपट आहे. ‘द काश्मीर फाईल्स’ आणि ‘द केरला स्टोरी’नंतर आता असाच आणखी एक चित्रपट येतोय. ‘७२ हुरें’ असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटावरुन सुरुवातीपासूनच वाद सुरू असून आता सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाच्या ट्रेलरला प्रमाणित करण्यास नकार दिला आहे. हा निर्णय ऐकून अशोक पंडित संतापले आहेत.

सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने चित्रपटातील काही विशेष दृश्ये, कुराण संदर्भ आणि प्राणी कल्याणाचा हवाला देऊन राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘७२ हुरें’ चित्रपटाच्या ट्रेलरला मान्यता देण्यास नकार दिला आहे. चित्रपट निर्मात्यांनी असा युक्तिवाद केला की चित्रपटाला आधीच सेन्सॉर प्रमाणपत्र असल्याने, तेच ट्रेलरला देखील लागू केले जावे. हा ट्रेलर २८ जून रोजी डिजिटल स्वरूपात प्रदर्शित करण्यात आला आहे. हा चित्रपट ७ जुलै रोजी इंग्रजीसह १० भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

 

सेंट्रल बोर्डाच्या निर्णयामुळे चित्रपट इंडस्ट्रीलाही मोठा धक्का बसला आहे. यामुळे सर्जनशील स्वातंत्र्य आणि सेन्सॉरशिपवर वादाला तोंड फुटले आहे. हे प्रमाणपत्र नाकारल्याबद्दल सह-निर्माते अशोक पंडित म्हणाले, “आम्ही एका मृतदेहाचे पाय दाखवले आहेत, ते दृष्य सेन्सर बोर्डाने काढण्यास सांगितले आहे.”
मिळालेल्या माहितीनुसार, धर्माच्या नावाखाली कशाप्रकारे ब्रेनवॉशिंग केले जाते, हे चित्रपटात दाखवण्यात आले आहे. विशेषत: जिहादच्या नावाखाली आत्मघाती हल्ले करणाऱ्यांचे चित्रण ‘७२ हुरें’ मध्ये केले आहे.

 

काही मुस्लिम धर्मगुरू आणि राजकीय व्यक्तींनी या चित्रपटाचा निषेध केला आहे. काहींनी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होऊ नये, असा युक्तिवाद केला आहे. या चित्रपटात हकीम अलीच्या भूमिकेत पवन मल्होत्रा आणि बिलाल अहमदच्या भूमिकेत आमीर बशीर दिसणार आहेत.

 

“तुम्ही मौलवी किंवा काझीकडून ७२ हुरें शब्द ऐकला आहे का? खरं तर ही वस्तुस्थिती आहे. मी काश्मीरचा आहे, तिथे प्रत्येक गल्लीत हा शब्द बोलला जातो. त्यामुळे हा चित्रपट धर्माच्या विरोधात आहे असं म्हणणं पूर्णपणे चुकीचं आहे. या चित्रपटातून आम्ही फक्त दहशतवादावर बोलत आहोत. दहशतवाद माझ्याइतका जवळून कोणी पाहिला नसेल. मी ज्या भागातून येतो तिथे मी रात्रंदिवस दहशतवाद पाहिला आहे. त्यावर आधारित या चित्रपटाचे नाव आहे.”अस अशोक पंडित यांनी सांगितले आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here