Educational : शाळेच्या पटावर शून्य विद्यार्थी संख्या असताना देखील शिक्षक शासनाचा फुकट पगार आणि संस्थाचालक अनेक योजना लाटत असल्याचा प्रकार पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरात असलेल्या एका शाळेतून समोर आला आहे.
शिक्षणाचे माहेरघर म्हणून पुणे जिल्ह्याला ओळखले जाते मात्र याच पुणे जिल्ह्यात मात्र शिक्षणाच्या नावाखाली शासनाचे पैसे फुकट लाटले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पिंपरी चिंचवड जिल्हा परिषद, महानगरपालिका प्रशासना व संस्थाचालकांनी केलेल्या दुर्लक्षामुळे गेल्या सहा महिन्यांपासून पिंपरी चिंचवड भागात असलेल्या कमला नेहरू शाळेतील शिक्षक फुकट वेतन घेत असल्याची बाब समोर आली आहे. यातील धक्कादायक गोष्ट म्हणजे शाळेची इमारत धोकादायक असल्याने महापालिका प्रशासनाने या शाळेत विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यापासून रोखलं होतं. मात्र शाळेची इमारत धोकादायक होईपर्यंत शिक्षण विभाग आणि संस्थाचालक यांनी शाळेची दुरुस्ती का केली नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या ठिकाणी शिकवणाऱ्या शिक्षकांना बाहेर शिकवण्यासाठी त्यांचा समायोजन केलं नसेल याची माहिती देखील समोर येत आहे.
आजच्या घडीला गेल्या सहा महिन्यांपासून मी अशा आहे. एकही विद्यार्थी नाही मात्र शाळेतील प्राचार्य आणि शिक्षकांनी जवळपास 28 लाखांहुन अधिक पगार अदा करण्यात आला आहे. गेल्या चार वर्षांपासून याशाळेत केवळ बोटावर मोजण्या एवढे विद्यार्थी उपस्थित असतात.
या शाळेत 2020 साली 10, 2021 साली 07, 2022 मध्ये 04 आणि यंदा 00 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. केवळ पाच ते दहा विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी या शाळेतील सर्व शिक्षक पूर्ण वेतन घेते. तसेच संस्थेकडून शासनाच्या योजनांचा लाभ देखील घेण्यात येत होता. जिल्हा परिषद आणि महापालिकेचा शिक्षण विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे. मात्र प्रशासनाने यावर आता कारवाई करणे गरजेचे आहे.
यातच संस्थाचालकांनी आणि प्रशासनाने मिळून हा घोटाळा केला असल्याचे सांगत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी आरटीआय कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम