पदवीधरांसाठी ‘एसबीआय’मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; तब्बल १,६७३ जागांसाठी भरतीप्रक्रिया सुरु

0
34

नाशिक : पदवीधरांसाठी देशातली सर्वात मोठी बँक असलेली भारतीय स्टेट बँकेत नोकरीची सुवर्णसंधी आहे. स्टेट बँकेत तब्बल १६७३ जागांसाठीची भरतीप्रक्रिया सुरु झाली आहे. याविषयीची जाहिरात भारतीय स्टेट बँकेकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे.

पद – प्रोबेशनरी ऑफिसर (PO)

एकूण जागा – १६७३

शैक्षणिक पात्रता

उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक. तसेच पदवीच्या अंतिम वर्षाला असणारा उमेदवारही अर्ज करु शकतो. मात्र, मुलाखतीवेळी ३१ डिसेंबर २०२२ पूर्वी पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ एप्रिल २०२२ पर्यंत २१ ते ३० वर्षांच्या दरम्यान असावे. इतर वर्गांसाठी मात्र वयातील सवलत सरकारच्या नियमानुसार लागू.

अर्ज शुल्क

  • सामान्य / ईडब्ल्यूएस / ओबीसी उमेदवारांसाठी – ७५० रुपये
  • एससी / एसटी / पीडब्ल्यूबीडी उमेदवारांसाठी – विना शुल्क

महत्वाच्या तारखा

  • ऑनलाइन रजिस्ट्रेशन प्रक्रिया – २२ सप्टेंबरपासून सुरु
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख – १२ ऑक्टोबर २०२२
  • अर्जात दुरुस्ती करण्याची अंतिम तारीख – १२ ऑक्टोबर २०२२
  • अर्जाची प्रिंटआउट काढण्याची अंतिम तारीख – २७ ऑक्टोबर २०२२
  • ऑनलाईन शुल्क भरण्याची तारीख – २२ सप्टेंबर ते १२ ऑक्टोबर २०२२

अधिक माहिती व अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा :


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here