खरेंना कोठडी, वकिलाची तबीयत बिघडली; या तारखेपर्यंत कोठडी

0
22

नाशिक: काल राज्यात खळबळ उडवून देणारे आणि आज दिवसभर चर्चेचा विषय असलेले लाचखोरी निबंधक खरे यांना कोठडी दिली आहे. नुकताच निवडून आलेल्या एका बाजार समिती संचालकाकडून ३० लाखांची लाच स्वीकारताना काल रंगेहात पकडले गेले होते. जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांना १९ मे पर्यंत ‘एसीबी’ कोठडीत ठोठावण्यात आली असून तसे आदेश न्यायालयाने दिलेत. खरे यांचे वकील साबद्रा यांना देखील न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून प्रकृती बिघडल्याने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील उपचार सुरू आहेत.

लाचलुपत प्रतिबंधक विभागाने काल (सोमवार) रात्री कॉलेजरोडवरील खरे यांच्या निवासस्थानी रचलेल्या सापळ्यात जिल्हा उपनिबंधक सतीश खरे अडकले होते. याप्रकरणात मध्यस्थी करणारे वकील शैलेश साबद्रा यांनाही ताब्यात घेण्यात आले असून खरे यांना ताब्यात घेतल्यानंतर दुसऱ्या पथकाने केलेल्या घरझडतीत १६ लाखांची रोकड तसेच ४३ तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

जिल्हा उपनिबंधक खरे तसेच वकील शैलेश साबद्रा यांना मंगळवारी दुपारी जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर.आर. राठी यांच्यासमोर हजर करण्यात आले. सरकारतर्फे सहायक अभियोक्ता दीपशिखा भिडे यांनी युक्तीवाद केला. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने खरे यांना १९ मे पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. तर साबद्रा यांना न्यायालयीन कोठडी देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर साबद्रा यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. साबद्रा यांच्या वतीने ज्येष्ठ विधीज्ञ अविनाश भिडे यांनी युक्तीवाद केला. साबद्रा यांचा जामीन अर्ज बुधवारी न्यायालयात दाखल करण्यात येणार आहे

दरम्यान जिल्हा उपनिबंधक म्हणून एस.वाय.पुरी यांनी पदभार स्वीकारला असून ते नंदुरबार येथे कार्यरत होते. लाच लुचपत विभागाच्या कारवाईमुळे सहकार विभागात एकच खळबळ उडाली आहे यामुळे नाशिकचे लक्तरे राज्यभर टांगली गेलीत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here