सटाणा नगरपालिकेचा नागरिकांच्या जीवाशी खेळ; शौचालयाची घाण रहिवासी भागातच विसर्जित

0
44

सटाणा – कोणतीही स्थानिक प्रशासन व्यवस्था ही नागरिकांच्या सोयी-सुविधांसाठी असते. मात्र सटाणा येथील नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना नागरिकांशी काहीही सोयर-सुतक नाही. उलट हे नागरिकांच्या जीवावर उठलेत की काय असच वाटतंय.

शौचालयांच्या टाक्या भरल्या की, त्या नगर पालिकेच्या वाहनांद्वारे उपसल्या जातात. व सदर मल हे निर्जन, पालिकेच्या ठरवून दिलेल्या ठिकाणी विल्हेवाट लावली जाते. मात्र सटाणा नगर पालिकेचे कर्मचारी सदर साफ केलेल्या शौचालयांच्या टाक्यांमधील मल हे निवासी ठिकाणीच टाकताय.

सटाणा #Satana शहरातील क्रांती नगर भागात असलेल्या पारिजात कॉलनी मध्ये नजीकच असलेल्या जागेत हे मुजोर नगर पालिका कर्मचारी या शौचालयांच्या टाक्यांमधील साफ केलेले मल-मूत्र विसर्जित करताय. यामुळे या भागात राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उभा राहिलाय.

पारिजात कॉलनी मधील स्थानिक रहिवाशांनी याबाबत तक्रार करून देखील याबाबत नगर पालिका मात्र ढिम्म आहे. निवडणुकीच्या वेळी हक्काने मत मागायला येणारे लोकप्रतिनिधी याबाबतीत निद्रावस्थेत आहेत का? असाच प्रश्न पडलाय.

अशा प्रकारे रहिवासी भागातच या मल-मूत्राच्या गाड्या निकामी करून, नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सटाणा नगरपालिका कर्मचाऱ्यांद्वारे केला जातोय.

आता याबाबतीत नगरपालिका, निवडून आलेले लोकप्रतिनिधी सदर मुजोर आणि निर्ढावलेल्या नगरपालिका कर्मचाऱ्यांवर काय कारवाई करतात, याचीच पारिजात कॉलनी मधील स्थानिक नागरिक वाट बघताय.

International Yoga Day 2023: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त युनेस्कोच्या मुख्यालयात काय खास ?

कोणतीही मोकळी जागा दिसली म्हणजे त्याचा वापर पडीक म्हणूनच करायचा, हीच मानसिकता नगरपालिकेची दिसतेय. आणि यामुळे नागरिकांच्या जीवाशी मात्र खेळ होतोय.  ज्याच्याशी नगरपालिकेला काहीही देने-घेणे दिसत नाही. नगरपालिका सोयी-सुविधा उपलब्ध करून देते, त्यासाठी विविध करांमधून मोबदला ही वसूल करते. मात्र इथे वेगळाच मोबदला नगरपालिका वसूल करतांना दिसतेय.

आधीच सुविधांच वाणवा आणि त्यात अशा प्रकारे जीवाशी खेळ, यामुळे नागरिक संताप व्यक्त करत आहेत. आता यावर काय पाऊल उचललं जातं, ते देव अथवा नगरपालिकाच जाणे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here