नाशिक: नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध सप्तश्रृंगी निवासीनी देवी या शक्तीपीठांना महाराष्ट्रामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. संपूर्ण भारतामधून देवीचे भक्त सप्तश्रृंगी गडावर देवीच्या दर्शनाला येत असतात. अशा महत्त्वपूर्ण शक्तीपीठाला वणी देवस्थानने पुढील २०/०७/२०२२ पासून ४५ दिवस मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याला कडाडून विरोध आता होत आहे.
कुठलिही स्पष्टता देवस्थान ट्रस्टने केलेली नाही. कालच एक पत्रक (प्रेस नोट) काढून त्यांनी मंदिर बंद ठेवणेविषयी माहिती दिली. यात ललिता शिंदे यांनी आक्षेप घेत जिल्हा प्रशासन व वणी देवस्थान यांच्या निदर्शनास काही बाबी आणून दिल्या आहेत.
४५ दिवस मंदिर बंद ठेवून आपण नक्की काय करणार आहात ? जे काही मंदिराबाबत, देवीच्या मुर्तीबाबत, तिच्या स्वरूपाबाबत काही बदल करणार आहात का ? हे भावीकांसमोर, जनतेसमोर यायला हवे.
देवीच्या मुर्तीबाबत आपण संवर्धन करणार आहे असे म्हटले आहे. याबाबत मा. पुरातत्व विभाग, भारत सरकार, महाराष्ट्र शासन यांची रितसर परवानगी घेतली आहे .का ? तसेच मुर्तीला हात लावण्याबाबत पुरातत्व विभाग यांची तज्ञ समिती वणी देवस्थानला भेट देवून गेली आहे का ? तसा अहवाल आपल्याकडे प्राप्त आहे का ? कारण महाराष्ट्रातील सर्व देवता मुर्तीच्या संवर्धनाबाबत पुरातत्व विभागाच्या सल्ल्याशिवाय हात लावण्यास मनाई आहे. आपण तसे काही केल्याचे दिसून येत नाही.
वणी देवस्थानने आपल्या पत्रामध्ये खाजगी संस्थांना पाचारण करून देवीच्या मुळ स्वरूपाला धक्का लावण्याचा गंभीर गोष्ट करणार आहेत असे समजते. मुळात खाजगी संस्थांना अशा देवीच्या स्वयंभू मुर्तीला हात लावण्याचा किंवा तिच्यामध्ये काही बदल करण्याचा, वज्रलेप करण्याचा कोणताही अधिकार नाही.
वणी देवस्थान ट्रस्ट आपल्या मनमानी पद्धतीने देवीच्या बाबतीत ४५ दिवस मंदिर बंद ठेवून आतमध्ये काय करणार हे कॅमेऱ्यासमोर होणे गरजेचे आहे. कारण लाखो भाविक भक्तांच्या भावना व श्रद्धा देवीशी जोडलेल्या आहेत.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे आण्ण अशी धर्मसभा त्यामध्ये आपल्या भारतातील शंकराचार्य, सर्व पीठाचे शंकराचार्य, साधुमहंत, मुर्तीकार तन यांना बोलावून कोणती धर्मसभा बोलावली नाही आणि अशा मनमानी पद्धतीने देवीच्या मुर्तीला, स्वरूपाला हात लावण्याचे धाडस करत आहे. तसेच वणी ग्रामस्थांशी, सरपंच आणि सदस्य ग्रामपंचायत यांना विश्वासात न घेता, ग्रामसभा न घेता देवीचे मंदिर ४५ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय हा चुकीचा आहे असे पत्रात शिंदे यांनी म्हटले आहे.
शिंदे पुढे म्हणाले की देवीच्या मुळ स्वरूपाला वज्रलेप करणार आहात की अजुन काही करणार आहात हे कुठेही आपण स्पष्ट केलेले नाही. जर उद्या काही भविष्यात देवीच्या मुर्तीच्या स्वरूपाला धक्का लागला तर यास जबाबदार कोण ? काही घडल्यास कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते. म्हणून आपण तातडीने वणी देवस्थानशी संपर्क करून त्यांची भूमिका, पारदर्शक भूमिका सर्व जनतेच्या समोर आली पाहिजे. नाहीतर भक्तांच्या मनामध्ये गोंधळ होऊ शकतो.
भारतातील जे प्रमुख देवस्थान आहेत, ते मुर्तीच्या संवर्धनाबाबत स्वरूपाबाबत जर काही झिज झाली असल्यास ते पुरातत्व विभाग, स्थानिक ग्रामसभा, साधुमहंत, शंकराचार्य यांच्याशी बोलून मगच निर्णय घेतला जातो. वणी देवस्थान ट्रस्टने असे काहीही केलेले नाही. उलट खाजगी संस्था अजिंक्यतारा कन्सलटंट यांच्याशी जवळीक करून ४५ दिवस मंदिर बंद ठेवून आतमध्ये कॅमेऱ्यासमोर काही न करता नक्की काय काय करणार आहेत हे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी वणी देवस्थानने ताबडतोब धर्मसभा बोलवावी आणि मगच मुळ देवीच्या स्वरूपाला हात लावावा. अन्यथा फार मोठा रोष व कायदा, सुव्यवस्था निर्माण होऊ शकते, याची आपण नोंद घ्यावी. धर्मसभा न घेता कुठलाही निर्णय वणी देवस्थान ट्रस्टने घेऊ नये, अशी मागणी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम