सप्तश्रृंगी गडावर लाखो भाविक अडकले ; भाविकांना ‘राज’ फटका

0
33

कळवण : महाराष्ट्रतील साडेतीन शक्ती पीठांपैकी एक म्हणजे सप्तशृंगी देवी याठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. आज गडावर जवळपास पाच लाख भाविक अडकल्याची माहिती समोर येत असून मोठ्या प्रमाणात यंत्रणेचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. भाविकांची ही गर्दी प्रशासनाच्या नियंत्रणाबाहेर गेली असल्याची माहिती मिळत आहे. राज ठाकरे यांच्या दौऱ्याने ही परिस्थिती ओढवल्याची चर्चा नागरिक करत आहेत.

आज घडलेल्या प्रकाराने प्रशासनाने तातडीने नव्याने येणाऱ्या भाविकांना नांदुरी गावात अडवले असून यामुळे नागरिकांना गडावर सकाळी सोडण्यात येईल अशी माहिती मिळत आहे. सध्या नवरात्र सुरु असल्याने सप्तश्रृंगी देवीच्या गडावर भाविकांची गर्दी सालाबाद प्रमाणे उसळली आहे खानदेशातील भाविक याठिकाणी मोठ्या उत्साहात येत असतात मात्र आज ही ट्रॅफिक कोंडी अतिशय त्रासदायक ठरली आहे. गडावर जमणाऱ्या गर्दीचा अंदाज नागरिकांना असताना ही प्रशासनानं काय केलं हा प्रश्न उपस्थित होत आहे. भाविकांची गर्दी इतकी मोठी झाली की ती नियंत्रणात ठेवणं प्रशासनाच्या आवाक्याबाहेर गेल्याचं चित्र आहे. मुळात प्रशासनाने आधीच अंदाज घेतला असता तर ही गैरसोय टाळता आली असती. या प्रकाराने नागरिक नांदुरी मधून परतीच्या प्रवासाला निघाले आहेत.

आज सुट्टीचा दिवस असल्याने भाविकांची झुंबड उडाली आहे. सप्तश्रृंगी गडावर आज लाखो भाविकांनी दर्शन घेतलं. सप्तश्रृंगी देवीच्या गडावर सध्याच्या घडीला लाखो भाविक अडकल्याची माहिती समोर आली आहे. भाविकांची गर्दी नियंत्रणात येत नसल्याने प्रशासनाने एकतर्फी वाहतूक सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. गडावर अडकलेल्या जवळपास पाच लाख भाविकांना खाली आणण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली रात्री उशिरा पर्यंत ही ट्रॅफिक जॅम असल्याची माहिती आहे.

रात्री गडावर जाणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने हा प्रकार घडला आहे. आज दिवसभरापासून प्रचंड वाहतूक कोंडी आहे. देवीच्या दर्शनासाठी राज्यातील वेगवेगळ्या भागातून भाविक येत असतात. जास्त गर्दीमुळे देवीचं दर्शन घेणं कठीण झाले आहे.

राज ठाकरेंमुळे लाखो भाविक गडावर अडकले ?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सप्तश्रृंगी गडावर आल्याने व्हीआयपी दर्शनाच्या नादात भक्तांची मात्र वाट लागल्याचे चित्र आहे. राज यांच्या वणी गडाच्या दौऱ्यामुळे सकाळपासून दर्शनासाठी गेलेल्या अनेक भाविकांना अद्याप दर्शन घेता आलेलं नाही. यामुळे राजकीय फटका भाविकांना बसल्याचे चित्र आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here