नाशिक प्रतिनिधी : राज्यात पावसाने थैमान घातले असून अनेक ठिकाणी दुर्दैवी घटना घडत आहेत, सप्तशृंगी गडावर गेल्या चार दिवसापासुन संततधार पाऊस कोसळत आहे. आज रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास सप्तशुंगी देवीच्या मंदिरातील परतीच्या मार्गावरील संरक्षण भिंतीवरून मुसळधार पाऊस सुरु असल्यामूळे खाली उतरणारे सहा भाविक पडल्यामुळे जखमी झाले. जखमींवर उपचार सुरु आहेत. अती मुसळधार पावसाने भाविकांची चांगलीच तारांबळ उडवली आहे.
देवीच्या दर्शनानंतर परतीच्या प्रवासाला असताना भाविकांना पावसाचा मोठा फटका बसला आहे, डोंगरावरून मोठ्या प्रमाणावर पाऊस येत असल्याने पाण्याचा जोर वाढला त्यात हे पाणी संरक्षण भितीवरून मोठ्या प्रमाणात वाहत असून मंदिराच्या पायरींवर पाण्याचा लोट वाढला आहे.
संरक्षण भिंत तुटून मोठ्या प्रमाणात पायरीवर पाणी येऊ लागले. याच वेळी भाविक पाण्याच्या ओघात पन्नास ते साठ पायरीवरून हे भाविक खाली वाहत आले यात कोणालाही काही पकडता आले नसून अनेकांच्या डोक्यावर हात पायाला जखमा झाल्या असून कातडी निघाली आहे तर काहींना मुका मार लागला आहे.
याबाबतची घटना देवी संस्थानचे कर्मचारी व स्थानिक व्यापारी यांना समजली असता तातडीने या भाविकांना देवी संस्थानच्या दवाखान्यात नेण्यात आले. तसेच दोन व्यक्ती डोक्यावर टाके टाकण्यात आले आहेत सर्व भाविकांना स्थानिकांनी उपचारासाठी दाखल केले आहे.
जखमींमध्ये निबाबाई नानु नाईक (वय : 45, रा एंरडोल) 2) अशिष तांरगे (वय : 23 रा. नागपुर 3) मनिष राऊत (वय 32 रा नागपुर) 4) पल्लवी नाईक (वय : 3 रा एरडोल) 5) शैला आव्हाड (वय : 7) यांचा समावेश आहे.
भाविकाना पुढील उपचारासाठी वणी येथे पाठविण्यात आले असून यावेळी देवी संस्थानचे कर्मचारी व ग्रामस्थ यानी सहकार्य करून रूग्णालयात डाॅ. धनश्री घोडके, निशा गायकवाड, कंपाउंडर शाताराम बेनके यांनी उपचार करून वणी येथील रूग्णालयात पाठविले आहे सर्व्यांची प्रकुर्ती व्यवस्थित असून त्यांना उपचारानंतर सोडण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम