Sanjay Raut | आज नाशिक लोकसभेचे उमेदवार राजाभाऊ वाजे आणि दिंडोरी लोकसभेचे उमेदवार भास्कर भगरे हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. यासाठी महाविकास आघाडीकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. दरम्यान, आज नाशिक येथे मध्यमांशी संवाद साधताना त्यांनी अजित पवार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यावरही निशाणा साधला.(Sanjay Raut)
दरम्यान,”अजित पवारांची ख्याती ही सध्या धमकी बहाद्दर अशी झाली असून, रोज उठून ते मतदारसंघातील 10 लोकांना धमक्या देत असतात, असे राऊत म्हणाले. पुढे ते म्हणाले की,”नरेंद मोदी व अमित शाह यांना महाराष्ट्राचे तुकडे करायचे आहे. त्यामुळे त्यांनी दोन पक्ष फोडले. मात्र, याची त्यांना मोठी किंमत मोजावी लागणार आहे. हा महाराष्ट्र त्यांना कधीही माफ करणार नाही. एवढं खोटं बोलणारा पंतप्रधान मी आजपर्यंत बघितला नाही. त्यासाठी ऑलिम्पिकमध्ये एखादा खेळ बघावा लागेल, अशी टिका त्यांनी पंतप्रधान मोदींवर केली. (Sanjay Raut)
Rajabhau Waje | नाशिक, दिंडोरीत आज महाविकास आघाडीचे जोरदार शक्तिप्रदर्शन
Sanjay Raut | काहीतरी धमकी वगैरे द्या
2019 मध्ये शरद पवारांनी (Sharad Pawar) सांगितलं म्हणूनच आपण भाजपसोबत गेलो असल्याचे अजित पवारांनी म्हटले होते. यावर संजय राऊत म्हणाले की, “हे अजून किती वेळा बोलणार आहे. ते गुळगुळीत झाले आहे. आता काहीतरी दुसरं बोला. काहीतरी धमकी वगैरे द्या. अजित पवारांची ख्याती ही सध्या धमकी बहाद्दर अशी झाली असून, ते सध्या रोज उठून मतदारसंघाततील 10 लोकांना काहीतरी धमक्या देतात. त्यामुळे हे असे वैचारिक वक्तव्य तुम्हाला शोभत नाही”, असे संजय राऊत म्हणाले.(Sanjay Raut)
Sanjay Raut | ‘पूर्ण बरे होऊनच परत या’; मनसेने भरला राऊतांचा मनोरुग्णालयाचा फॉर्म
नाशिकमध्ये आम्हाला समोर गद्दारच हवा
दरम्यान, नाशिकमध्ये आज महाविकास आघाडीकडून जोरदार शक्तिप्रदर्शन होणार असून, नाशिक आणि दिंडोरी लोकसभेचे दोन्ही उमेदवारी हे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, “महाविकास आघाडीला शक्तिप्रदर्शन कशासाठी करावे लागत नाही. नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही जागांवरून महाविकास आघाडीचे उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून येईल. अजून राजाभाऊच्या विरोधात महायुतीला उमेदवारच मिळत नाही. पण नाशिकमध्ये आम्हाला समोर गद्दारच हवा आहे. आणि त्यांना आम्ही गाडणारच, असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला. (Sanjay Raut)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम