Sanjay Raut | लोकसभा निवडणुकांच्या राजकीय वातावरणात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नाशिक महानगपलिका आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. थेट त्यांनी नाशिकमधील काही बड्या बिल्डरचे नाव घेत मनी लाँड्रिंगचे आरोप केले आहेत.
घोटाळ्याचे लाभार्थी स्वतः मुख्यमंत्री
नाशिक महानगरपालिकेत तब्बल ८०० कोटींचा भूसंपादन घोटाळा झाला असून, या घोटाळ्याचे लाभार्थी हे स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. नाशिकमधील काही नामांकित बिल्डर ठक्कर बिल्डर, मनवाणी बिल्डर आणि शाह बिल्डर यांच्यासह इतरांनी हा भूसंपादन घोटाळा केलेला आहे.
Sanjay Raut | मुख्यमंत्र्यांच्या मांडीला मांडी लाऊन बसले
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसांपूर्वी नाशिकमध्ये आले असता, यावेळी हेच बिल्डर नाशिकमध्ये त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले असल्याचे संगत त्यांनी थेट हे फोटोच दाखवले. यामधील एकट्या ठक्कर बिल्डरने दोन कोटींची जमीन खरेदी केली असून, ती नाशिक महानगरपालिकेला ५० कोटी रुपयांना विकली आणि यातून त्यांनी ३५३ कोटी मिळवले.
नगरविकास खात्याच्या अधिकाऱ्यांना लाभ
नशिक पालिकेत शेतकरी असल्याचे सांगून या बिल्डर लोकांनी भूसंपादन केले, असे आरोप राऊत यांनी केले आहेत. यातून मुख्यमंत्री आणि नगरविकास खात्याच्या अधिकाऱ्यांना लाभ झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तर, या प्रकरणाची एसआयटी चौकशी व्हावी, अशी मागणीही यावेळी राऊत यांनी केली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम