संजय राऊत यांच्या विरोधात भरभक्कम पुरावे ED च्या हाती ?

0
35

मुंबई: पत्रा चाळ प्रकरणात तुरुंगात असलेले शिवसेनेचे फायर ब्रॅण्ड नेते खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता वाढली आहे. ईडीने बुधवारी विविध ठिकाणी केलेल्या छापेमारीत काही महत्त्वाचे कागदपत्रे हाती लागल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्यात सध्या जगत असलेल्या या कारवाई संदर्भात ईडीने बुधवारी मुलुंड, भांडूप, तसेच विक्रोळी परिसरात छापेमारी कल दिवसभर केली होती.

काल इडीने मुलुंड येथे श्रद्धा डेव्हलपर्स कंपनीच्या कार्यालयावर छापा मारला. छापेमारी दरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांनी कागदपत्रांसह संगणकाचीही तपासणी केली. श्रद्धा डेव्हलपर्सचे विक्रोळी, भांडुप तसेच मुलुंड परिसरात इमारत बांधकामाचे प्रकल्प मोठ्या प्रमाणात सुरू असून यापैकी अनेक कामे हे संजय राऊत यांचे भाऊ सुनिल राऊत यांच्या मतदारसंघातील आहे. काही प्रकल्प पूर्ण झाले असून काहींचे बांधकाम सुरू असल्याने यात राऊत यांचा संबंध आहे का याचा देखील तपास केला जाणार आहे.

श्रद्धा डेव्हलपर्स ईडीच्या रडारवर !
संजय राऊत यांच्या कारची खरेदी श्रद्धा डेव्हलपर्सकडून करण्यात आली असल्याची माहिती तपासाता समोर आली. यामुळे ईडीने छापा मारला. श्रद्धा डेव्हलपर्स ची कार आणि संबंधीत आर्थिक व्यवहाराची चौकशी ईडीकडून होणार आहे. पत्राचाळ घोटाळ्यातील पैशांची विल्हेवाट लावण्यासाठी श्रद्धा डेव्हलपर्सने राऊत यांना मदत केली असल्याचा संशय व्यक्त केला आहे. पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत यांची पत्नी वर्षा आणि प्रवीण राऊत यांची पत्नी माधुरी यांच्या एकत्रित मालकीच्या अवनी इन्फ्रास्ट्रक्चरच्या कार्यालयाचीही ईडीने झाडा झडती घेतली आहे.

श्रद्धा डेव्हलपर्सने पूर्व उपनगरात बांधकाम प्रकल्प पूर्ण केले आहेत. या प्रकल्पांसाठी श्रद्धा डेव्हलपर्सचा पैसा कोणता याचाही शोध ईडीकडून सुरू आहे.

संजय राऊत यांच्यावरील आरोप ?
ईडीने राऊत यांचा पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी थेट संबंध असल्याचा आरोप केला. प्रविण राऊत पत्राचाळ चे व्यवहार पाहत होते. त्यांना HDIL ग्रुपकडून 112 कोटी रुपये मिळाले. त्यातील 1 कोटी 6 लाख 44 हजार रुपये वर्षा राऊत यांच्या खात्यात पाठवले तसेच अलिबाग येथे या पैशातून जमीन घेण्यात आली असा ठपका आहे.

 

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here