खळबळ! महिला उपजिल्हाधिकाऱ्याचा विनयभंग करत प्राणघातक हल्ला

0
22

द पॉईंट नाऊ ब्युरो : नुकतीच एका महिला नायब तहासिलदारावर हल्ल्याची घटना ताजी असतांनाच आता सांगलीच्या उपजिल्हाधिकाऱ्यावर एका अज्ञाताने हल्ला केल्याची घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सांगलीच्या उपजिल्हाधिकारी हर्षलता गेडाम या पहाटे विश्रामबाग येथील नेमिनाथनागरमधील बागेत जॉगिंगसाठी गेल्या होत्या. त्यावेळी दोघे जण दुचाकीवरून आले आणि त्यांनी गेडाम यांच्या हाताला पकडत त्यांचा विनयभंग केला. यावर संतप्त गेडाम यांनी एकाला लाथ मारून खाली पाडले. यावेळी झालेल्या झटापटीत त्यांच्यावर एकाने चाकूने प्राणघातक हल्ला केला. यात त्या जखमी झाल्या आहेत. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, या दोघांपैकीच एका जनाने याआधी देखील आपला पाठलाग करून छेड काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यावेळी आपण दुर्लक्ष केले, असे हर्षलता गेडाम यांनी सांगितले आहे. मात्र त्यांच्या या दुर्लक्ष करण्यामुळे सदर तरुणांची मजल थेट गेडाम यांच्यावर हल्ला करण्यापर्यंत गेली. या घटनेमुळे सांगलीमध्ये खळबळ उडाली आहे.

नुकतीच काही दिवसांपूर्वी एका महिला नायब तहसीलदारावर त्यांच्याच भावाने तहसील कार्यालयात चाकूने प्राणघातक हल्ला केला होता. आणि आता उपजिल्हाधिकाऱ्यावर झालेल्या या घटनेने, जर अधिकारीच सुरक्षित नसतील, तर सामान्य नागरिकांचं काय, असा सवाल नागरिक करू लागले आहेत


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here