मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर राज्यभरातील मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. राज्यात अनेक ठिकाणी सकाळी मशिदींसमोर हनुमान चालीसा लावण्यात आले.या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेत संदिप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्या अडचणीत वाढ झाली असून त्यांच्याविरोधात मुंबईतील शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर देशपांडेंभोवती पोलिसांसह माध्यमांच्या प्रतिनिधींचाही गराडा होता. पण तेवढ्यात देशपांडेंच्या वाहनचालकाने त्यांची गाडी पोलिसांच्या वाहनाजवळ आणली . पोलिसांना चकवा देऊन देशपांडे आपल्या गाडीत बसले आणि चालकाने थेट गाडी पुढे नेली. संदिप देशपांडे यांना शिवतीर्थबाहेर पळून जाताना पोलिसांशी झालेल्या झटापतीत एक महिला पोलिस कर्मचारी जखमी झाली आहेत. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याच प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देशपांडे यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांनी दिले होते. ते म्हणाले, मनसेचे नेते संदिप देशपांडे यांनी आज मुंबई पोलीस दलातील महिला अधिकारी यांचेशी केलेल्या गैरवर्तनाची माहिती मी पाहिली, असून सदरच्या घडलेल्या गंभीर प्रकाराबद्दल तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांना दिले आहेत. आता पुढे राज ठाकरे कोणती भूमिका घेतली याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम