इगतपुरी: समृद्धी महामार्ग हा इगतपुरी तालुक्यातील नांदगाव सदो ते शेणित मधून जात असून अनेक शेतकऱ्यांनी शासनाला जमिनी देत त्याग केला आहे उरलेली लगतची जमीन हि महामार्ग उंचीवर असल्याने नापिक झाली आहे. तसेच उरलेल्या शेतीत शेतकऱ्यांना ये जा करणेसाठी तीन चार किलोमीटर वरून फेरा मारावा लागणार आहे म्हणून पूर्ण इगतपुरी तालुक्यात तारांगण पाडा ते उभाडे येथील समृद्धी महामार्गाला सर्व्हिस रोड देण्यात यावा अशी मागणी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव भास्कर गुंजाळ यांनी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री ना नितीन गडकरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे
गुंजाळ यांनी यासाठी अनेकदा राज्याचे तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा मुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे यांना निवेदणं दिली मात्र फारसा उपयोग झाला नाही म्हणून शिष्टमंडळासोबत गडकरी साकडं घातलं त्यात त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे गुंजाळ यांनी सांगितले शिष्टमंडळात काँग्रेसचे मा तालुकाध्यक्ष रामदास धांडे,उपाध्यक्ष ज्ञानेश्वर खातळे,युवक काँग्रेस सरचिटणीस योगेश सुरुडे, शरद गुंजाळ,अर्जुन गुंजाळ इ कार्यकर्ते होते
समृद्धी महामार्गाचं काम जेव्हापासून चालू झालंय तेव्हापासून लगतचे रस्ते अत्यंत खराब झाले असून सर्व्हिस रोड करण्यात यावा व पिंप्री फाटा ते तळोशी मार्गे घोटीसाठी रिंग रोड करण्यात यावा हि प्रमुख मागणी ना नितीन गडकरी यांच्याकडे केली असून त्यामुळे भविष्यात या भागाची सुधारणा होणेसाठी वाव मिळणार आहे
– भास्करराव गुंजाळ
सचिव – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम