नाशिक – गेल्या काही वर्षांपासून मानवी वस्त्यांमध्ये बिबट्या वावरण्याचे प्रमाण वाढत असून नाशिक शहर व जिल्ह्यात अनेकदा बिबट्याचे दर्शन घडले आहे. आता नुकतीच एक घटना गंगापूरजवळील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ परिसरात घडली असून तिथे कुलगुरूंच्या निवासस्थानाबाहेरून बिबट्याने पिल्लाचा फडशा पाडला आहे.
व्हिडीओत एक कुत्रा आपल्या पिल्लासोबत रस्त्यांवरून जात असताना एक बिबट्या तिथे लगेच येत त्या पिल्लाला आपल्या जबड्यात घेऊन पसार होतो. रविवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास ही घटना घडली असून दृश्ये सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
दरम्यान, परिसरात बिबट्याच्या वावरामुळे तिथल्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे विद्यापीठ परिसरात राहणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन कुलगुरू आणि कुलसचिव यांनी केले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम