Sambhaji bhide : वादग्रस्त वक्तव्य करून तेढ निर्माण करणाऱ्या भिडेंचे कार्यक्रम रद्द करण्याची मागणी नांदेड मध्ये करण्यात आली आहे.
महापुरुषांचा चुकीचा इतिहास सांगणे व धर्मा-धर्मात तेढ निर्माण होणारे विधान करणाऱ्या वादग्रस्त संभाजी भिडे यांचे नांदेड जिल्ह्यातील सर्व कार्यक्रम रद्द करावेत, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
संभाजी भिडे हे धर्मा-धर्मात तेढ निर्माण होईल, अशी वादग्रस्त विधाने करतात हे माहीत असतानाही त्यांना महाराष्ट्रभर फिरू कसे दिले जाते? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. नांदेड जिल्ह्यात 14 जुलै रोजी संभाजी भिडे यांच्या बैठका होणार आहेत. त्यात भडकावू वक्तव्ये होऊन नांदेडसह राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडू शकते. तेव्हा संभाजी भिडे यांचे नांदेड जिल्ह्यातील कार्यक्रम रद्द करावेत, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले आहे. नांदेड आत होणारे संभाजी भिडे यांचे कार्यक्रम रद्द करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे करण्यात आले आहे. यावेळी संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम