Salman Khan ‘Tiger 3’ Vs ‘The Marvels’; दोन्ही चित्रपट एकाच दिवशी येणार भेटीला

0
13

Salman Khan Tiger 3 Vs The Marvels: बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा टायगर 3 आणि मार्व्हल मुव्हीचा एक चित्रपट एकाच दिवशी चित्रपटगृहात दाखल होणार आहेत.

या लढतीत कोण बाजी मारणार?

यंदाची दिवाळी खऱ्या अर्थाने जोरदार गाजणार आहे. यंदाच्या दिवाळीमध्ये दोन बहुप्रतिक्षित चित्रपट ‘टायगर थ्री’ आणि ‘द मार्व्हल्स’ प्रदर्शित होणार आहेत.हे दोन्ही चित्रपट दहा नोव्हेंबरला प्रदर्शित होणार असून यामुळे या वर्षीची दिवाळी ॲक्शन आणि थरारपट सिनेमाप्रेमींसाठी कायम लक्षात राहील अशी ठरणार आहे. बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि कॅटरिना कैफची जोडी ‘टायगर थ्री’ मध्ये पुन्हा एकदा प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. तर ‘द मार्व्हल्स’ मध्ये सुपर हीरो धमाल उडवणार आहेत .या दोन चित्रपटांमुळे सिनेमाप्रेमींसाठी हि दिवाळी डबल बोनस ठरणार आहे.

IBD 3 : पुण्याच्या ‘समर्पण लामा’ने जिंकली ‘इंडियाज बेस्ट डान्सर 3’ची ट्रॉफी

‘टायगर थ्री’ हा चित्रपट टायगर सीरिजमधील तिसरा चित्रपट आहे. ठराविक ॲक्शन सीन आणि जबरदस्त कथानक असलेल्या या चित्रपटाची प्रचंड उत्सुकता प्रेक्षकांना लागलेली आहे. या स्पाय थ्रिलर चित्रपटाचा टीझर प्रसिद्ध करण्यात आला असून यामध्ये रॉ एजंट असलेला सलमानची या चित्रपटातील झलक दाखवण्यात आली आहे. दुसरीकडे मार्व्हल्स सिने विश्वातील पुढील चित्रपट ‘द मार्व्हल्स’ हा देखील प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. सुपर हिरोंची थरारक कामगिरी या चित्रपटातून पहायला मिळणार आहे. या दोन जबरदस्त चित्रपटांचा यंदाच्या दिवाळीत एकमेकांशी जोरदार मुकाबला होणार आहे. यामुळे यंदाची दिवाळी अजूनच बहारदार होणार असून मनोरंजनाची ही आतिषबाजी सिनेरसिकांना मंत्रमुग्ध करणारी ठरेल यात तिळमात्रशंका नाही.

Tamilnadu Bus Accident :तामिळनाडूमध्ये प्रवासी बस 100 फूट दरी कोसळून 9 जणांचा मृत्यू

हे दोन्हीही सिनेमे १० नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहेत. दिवाळीत एकीकडे आकाशात आतिषबाजी पाहायला मिळेल तर दुसरीकडे मोठ्या पडद्यावर जेव्हा हे चित्रपट प्रदर्शित होतील तेव्हा चित्रपटगृहा मध्येदेखील मनोरंजनाच्या आतिषबाजीला सुरुवात होईल. हे चित्रपट पाहणं हे एका अर्थाने चित्रपट निर्मात्यांचे कौशल्य आणि त्यामागची तळमळ दर्शवणारे ठरणार आहे.(Salman Khan Tiger 3 Vs The Marvels)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here