सलमान खानने ऐश्वर्या रायसाठी ‘या’ अभिनेत्रीला सोडलं

0
41

किर्ती आरोटे

द पौइंट नाऊ प्रतिनिधी:  सलमान खान त्याच्या प्रोफेशनल लाईफमुळेच नाही तर पर्सनल लाईफमुळेही चर्चेत असतो. सोमी अलीपासून ते संगीता बिजलानीपर्यंत आणि ऐश्वर्या रायपासून ते कतरिना कैफपर्यंत सलमान खानच्या अफेअरचे किस्से इंडस्ट्रीत प्रसिद्ध आहेत. आज आम्ही तुम्हाला सोमी अलीबद्दल सांगणार आहोत, जी सलमान खानची पहिली गर्लफ्रेंड होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोमी अली आणि सलमान खान एकेकाळी गंभीर  होते, असे म्हटले जाते की त्यांचे अफेअर आठ वर्षे चालले पण हे प्रकरण लग्नापर्यंत पोहोचण्यापूर्वीच त्यांचे ब्रेकअप झाले.

बातमीनुसार, सोमी अली फ्लोरिडाहून सलमान खानसोबत लग्न करण्याच्या उद्देशाने भारतात आली होती. सोमीने एका मुलाखतीत सांगितले होते की, ‘मैने प्यार किया’ चित्रपट पाहिल्यानंतर ती सलमान खानच्या प्रेमात पडली होती आणि तिने विचार केला होता की तिला फक्त सलमान खानशीच लग्न करेल आणि मग ती भारतात आली.

इथे येऊन तिने काही सिनेमे केले ‘अंत’, ‘तिसरा कौन’, ‘अग्निचक्र’ इत्यादी मध्ये काम केल पण तिला यश प्राप्त झाल नाही. दरम्यान अभिनेत्रीचे सलमान खान बरोबर प्रेमाच्या चर्चा समान्य झाल्या होत्या.

दरम्यान, ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सलमान खानने अभिनेत्री ऐश्वर्या राय याचं प्रेम प्रकरणाला सुरुवात झाली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, स्वतः सोमी अलीने एकदा एका मुलाखतीत सांगितले होते की, सलमान खान तिचा बॉयफ्रेंड होता पण ऐश्वर्या मध्यभागी आल्यानंतर त्यांचे नाते तुटले. सोमी अलीने आजपर्यंत लग्न केलेले नाही.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here