मुंबई: देशात प्रगती झाली अस म्हणायचं देशभरातील चकचकीत रस्ते विकासाची कहाणी सांगताना दिसतात, पण त्याचा आणखी एक पैलू विसरून चालणार नाही तो म्हणजे त्यांच्यावर होणारे जीवघेणे अपघात. महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर रविवार, ४ सप्टेंबर रोजी झालेल्या अपघातात उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा मृत्यू व शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांचा पुणे मुंबई हायवे वरील अपघात असो वर्षभरात अशा हजारो-लाखो घटना घडतात.
भारतातील रस्त्यांवर अशा अपघातांची संख्या भयावह आहे. जर आपण गेल्या वर्ष 2021 बद्दल बोललो तर, राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्युरो म्हणजेच NCRB च्या आकडेवारीनुसार, देशभरात एकूण 4 लाख 3 हजार 116 रस्ते अपघात झाले ज्यामध्ये एकूण 1 लाख 55 हजार 622 लोकांचा मृत्यू झाला.
आधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेले राष्ट्रीय महामार्गही सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे, तर अपघातांचे प्रमाणही अधिक आहे. 2021 सालाबद्दलच बोलायचे झाले तर, एकूण 1 लाख 22 हजार 204 अपघात झाले, ज्यात 53 हजार 165 लोकांना आपला जीव गमवावा लागला. एनसीआरबीच्या आकडेवारीवरून असे दिसले की, 2021 मध्ये राष्ट्रीय महामार्गांवर प्रति शंभर किलोमीटरवर सरासरी 40 मृत्यू झाले. 2020 मध्ये हा आकडा 36 होता.
या महिन्यात सर्वाधिक रस्ते अपघात
आकडेवारीचे विश्लेषण केल्यास असे दिसून येते की असे रस्ते अपघात बहुतेक डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात होतात. थंडीच्या दिवसात रस्त्यावरील धुके नीट दिसत नसल्यामुळे हे बहुतांशी घडत असल्याचे जाणकारांचे मत आहे. दुसरीकडे, अपघातांचे मुख्य कारण म्हणजे बेपर्वाई आणि वेगात वाहन चालवणे. 2021 मध्ये रस्ते अपघातांमुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी 44.5 टक्के मृत्यू दुचाकी अपघातांमध्ये झाल्याचेही आकडेवारीवरून दिसून येते.
नुकतेच महाराष्ट्रातील एक मोठे नेते शिवसंग्रामचे प्रमुख विनायक मेटे यांचा मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खोपोलीजवळ कार अपघातात मृत्यू झाला. मेटे हे एसयूव्ही कारमधून पुण्याहून परतत असताना हा अपघात झाला. यामुळे महागड्या कार शोभेच्या आहेत का असाही प्रश्न उपस्थित राहतो आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम