टोमॅटोची मागणी वाढल्याने भाव वधारला ; शेतकरी समाधानी

0
15

सर्वसामान्य नागरिकांच्या आहारातही टोमॅटोची भाजी नियमित आहे. त्यामुळे वर्षभर टोमॅटोची मोठ्या प्रमाणात मागणी असते. भाजी मंडईत मागील काही दिवसांपासून टोमॅटोची आवक घटली आहे. त्यामुळे टोमॅटोच्या दरांमध्ये मोठी वाढ झाली आहे.

मागील आठवड्यात ६०-७० रुपये प्रतिकिलो भावाने
टोमॅटोची विक्री केली गेली. किरकोळ मार्केटमध्ये ८०-१०० रुपये प्रतिकिलो टोमॅटोचे दर. शेतकऱ्यांना मात्र तोटा सहन करावा लागत आहे. आज पुणे, मुंबई घाऊक मार्केट आणि किरकोळ मार्केटमध्ये ८०-१०० रुपये प्रतिकिलो टोमॅटोचे दर झालेले आहेत. लग्नसराईचा काळ असल्यामुळे टोमॅटोला चांगलीच मागणी वाढली. यंदाच्या कडक उन्हाळ्यामुळे टोमॅटोच्या लागवडीत मोठी घट झाली आहे.

त्यामुळे बाजारात टोमॅटोची आवकही कमी झालेली आहे. जर टोमॅटोची आवक वाढली नाही, तर १०० रुपयांच्याही पुढे टोमॅटोचे भाव जाण्याची शक्यता आहे. नागरिकांना महागाईचा मोठा फटका बसत आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबईमध्ये नियमितपणे सर्वाधिक मागणीमध्ये टोमॅट आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडूमध्ये टोमॅटोची कमतरता झाली आहे. तेथेही महाराष्ट्रातून टोमॅटो इतर देशांत पाठवला जातो. मागणी वाढली मात्र यंदाचं टोमॅटोचं उत्पादन कमी झाल्यामुळे टोमॅटो वधारला आहे. त्यामुळे दरात भाववाढ झाली.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here