द पॉइंट नाऊ: मुंबईतील जनतेच्या खिशावरचा बोजा वाढणार आहे. टॅक्सी आणि ऑटोच्या भाड्यात वाढ करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मुंबई महानगरात काळ्या-पिवळ्या टॅक्सीतून प्रवास करण्यासाठी आता पूर्वीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. मुंबई पाठोपाठ महाराष्ट्रातील इतर शहरातही रिक्षा टॅक्सी भाडे वाढण्यात येऊ शकते.
मिळालेल्या माहितीनुसार, टॅक्सीच्या भाड्यात २८ रुपयांनी तर ऑटोच्या भाड्यात २३ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन ट्रान्सपोर्ट अथॉरिटी (MMRTA) नुसार, मुंबईतील लोकांना आता टॅक्सीसाठी प्रति किमी ३ रुपये आणि ऑटोसाठी २ रुपये प्रति किमी जास्त मोजावे लागतील. वाढीव भाडे १ ऑक्टोबरपासून लागू होणार आहे.
मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाच्या नवीन नियमांनुसार, मुंबई महानगर प्रदेश आणि त्याच्या लगतच्या भागात १.५ किमी अंतरासाठी काली-पेली टॅक्सींचे किमान भाडे २५ रुपयांवरून २८ रुपये करण्यात आले आहे. त्याचबरोबर ऑटोरिक्षातील दीड किमीच्या प्रवासाचे किमान भाडे २१ रुपयांवरून २३ रुपये करण्यात आले आहे.
महाराष्ट्र परिवहन सचिव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एमएमआरटीएच्या बैठकीत भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आला. नवीन नियमांनुसार, सुरुवातीच्या १.५ किमीनंतर प्रत्येक किलोमीटरसाठी १६.९३ रुपयांऐवजी १८.६६ रुपये मोजावे लागतील. त्याचप्रमाणे, ऑटो-रिक्षासाठी १.५ किमी नंतर प्रत्येक किलोमीटरसाठी १४.२० रुपयांऐवजी १५.३३ रुपये मोजावे लागतील.सध्या, मुंबईत सुमारे ४.६ लाख ऑटो-रिक्षा चालतात, ज्यांचे सध्याचे भाडे १ मार्च २०२१ पासून लागू आहे. मात्र नव्या बदलांनंतर १ ऑक्टोबरपासून त्यात वाढ होणार आहे. वाढलेले भाडे पेट्रोल तसेच सीएनजीवर चालणाऱ्या टॅक्सींना लागू होणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून पेट्रोलसोबतच सीएनजीच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. १ मार्च २०२१ पासून CNG ची किंमत ४९.४० रुपये प्रति किलोवरून ८० रुपये प्रति किलो झाली आहे. त्यामुळे रिक्षा आणि टॅक्सी यांचे भाडे वाढवण्याचा निर्णय महाराष्ट्र परिवहन सचिवांनी घेतला आहे मुंबई पाठोपाठ नाशिक बरोबर महाराष्ट्रातील इतर शहरांमध्येही लवकरच रिक्षा व टॅक्सी भाडे वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम